BEST Bus | मुंबईची दुसरी लाईफलाईन प्रवाशांसाठी ‘काळ’, पाच वर्षांत ‘बेस्ट’चे 97 जीवघेणे अपघात, मृतांचा आकडा किती?

| Updated on: Feb 16, 2022 | 10:06 AM

गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसच्या 97 अपघातात 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 872 अपघातात साडेसहाशे जण जखमी झाले आहेत. गेल्या 5 वर्षांत म्हणजे 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत बेस्ट बसेसच्या 97 अपघातात 98 प्रवासी किंवा पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती बेस्ट उपक्रमाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

BEST Bus | मुंबईची दुसरी लाईफलाईन प्रवाशांसाठी काळ, पाच वर्षांत बेस्टचे 97 जीवघेणे अपघात, मृतांचा आकडा किती?
बेस्ट बस - प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : मुंबई लोकल ही शहराची लाईफलाईन मानली जाते, तर मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बस (Mumbai BEST Bus) ओळखली जाते. मात्र ही लाईफलाईन प्रवाशांसह पादचाऱ्यांसाठी काळ ठरताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसच्या 97 अपघातात 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 872 अपघातात साडेसहाशे जण जखमी झाले आहेत. मुंबईकरांची पहिली लाईफ लाईन मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत (Mumbai Local) रोज दहा जणांचा अपघात होत असून वर्षांला चार हजार प्रवासी आणि रुळ ओलांडणाऱ्यांना जीव गमवावा लागतो. बेस्ट बसच्या अपघातात (Bus Accident) घट झाली असली तरी गेल्या 5 वर्षांत म्हणजे 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत बेस्ट बसेसच्या 97 अपघातात 98 प्रवासी किंवा पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती बेस्ट उपक्रमाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. 5 वर्षांत विविध ठिकाणी झालेल्या बेस्ट बसेसच्या 872 अपघातात 653 जण जखमी झाल्याने बेस्ट बस म्हणजे मुंबईची दुसरी लाईफ लाईन प्रवाशांसह पादचाऱ्यांसाठी काळ ठरताना दिसत आहे.

असे झाले अपघात व मृत्यू!

1 एप्रिल 2016 ते मार्च 2017
अपघात – 21 – मृत्यू – 22
—-
1 एप्रिल 2017 ते मार्च 2018
अपघात – 21 – मृत्यू – 21
—-
1 एप्रिल 2018 ते मार्च 2019
अपघात – 23 – मृत्यू – 23

1 एप्रिल 2019 ते मार्च 2020
अपघात – 10 – मृत्यू – 10
—-
1 एप्रिल 2020 ते मार्च 2021
अपघात – 13 – मृत्यू – 13

1 एप्रिल 2021 ते जानेवारी 2022
अपघात – 9 – मृत्यू – 9

——————
अपघात व जखमी!

1 एप्रिल 2016 ते मार्च 2017
अपघात – 383 – जखमी – 265
—-
1 एप्रिल 2017 ते मार्च 2018
अपघात – 142 – जखमी – 130
—–
1 एप्रिल 2018 ते मार्च 2019
अपघात – 116 – जखमी – 87
—-
1 एप्रिल 2019 ते मार्च 2020
अपघात – 91 – जखमी – 69
—-
1 एप्रिल 2020 ते मार्च 2021
अपघात – 78 – जखमी – 48

1 एप्रिल 2021 ते जानेवारी 2022
अपघात – 62 – जखमी – 54

संबंधित बातम्या :

कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू

ज्या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा अंत झाला, त्या गाडीची अवस्था दाखवणारा व्हिडीओ पाहा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार