VIDEO | पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार

रणजीत जाधव

रणजीत जाधव | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Feb 15, 2022 | 11:24 AM

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात घडला. आडोशी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने हा विचित्र अपघात झाल्याची माहिती आहे.

VIDEO | पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे (Pune Mumbai Express Way) पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा होताना दिसत आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर सात वाहनांचा विचित्र अपघात (Car Accident) झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात चार प्रवाशांना जागीच प्राण गमवावे लागले. तर 9 जण जखमी झाले आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. ट्रेलरचा (Trailer Accident) ब्रेक फेल झाल्याने हा विचित्र अपघात झाला. अपघातानंतर सात वाहनं एकमेकांवर आदळली. यावेळी दोन ट्रकच्या मध्ये स्विफ्ट कार अडकली होती. या गाडीतील चौघे जण जागीच ठार झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात घडला. आडोशी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने हा विचित्र अपघात झाल्याची माहिती आहे. यात दोन ट्रकच्या मध्ये अडकलेल्या स्विफ्ट कारमधील चौघे जण जागीच मृत्युमुखी पडले, तर नऊ जण जखमी झाले आहेत.

अपघाताची घटना समजताच खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचली. पोलिसांची टीम आणि इतर यंत्रणांनी अपघातग्रस्तांना मदत केली. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. तर जखमींना खोपोलीत अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

दुचाकी स्लीप होऊन चालक कंटेनरच्या चाकात अडकला; मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

Video : बुलडाण्यातल्या भयानक अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, एसटी आली आणि उडवून…

पुणे मुंबई महामार्गावर पिक अप-ट्रकचा अपघात, केळी रस्त्यावर पसरली, निसरड्या रस्त्यांवरुन गाड्या घसरल्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI