अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक

| Updated on: Jul 26, 2021 | 11:44 AM

अंधेरी एमआयडीसी परिसरात आरोपी सेक्स रॅकेट चालवून मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आहे. यातून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.

अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक
अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
Follow us on

मुंबई : मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन पीडित मुलींची सुटका करण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेला यश आले आहे. या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा स्वत:साठी वापर करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

संदीप कुमार सिन्हा, (दलाल) विकास उर्फ मनोज यादव, सिकंदर उर्फ जुगल सिंग अशी या अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अंधेरी एमआयडीसी परिसरात आरोपी सेक्स रॅकेट चालवून मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आहे. यातून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट

दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

चार पीडित मुलींची सुटका

नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दोन लाखांचे निरोध सापडले

अटकेतील आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा, तर एका महिलेचा समावेश आहे. वसुंधरा संजय तिवारी (वय 48) आणि अंजली राजकुमार यादव (वय 45) असे अटक आरोपींची नाव असून वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. या आरोपींकडून 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे निरोध (कंडोम्स) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम आणि मोबाईल ही जप्त केले आहेत.

संबंधित बातम्या :

ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका कशी केली? कारवाईची A टू Z माहिती

NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले

(Mumbai Andheri MIDC Illegal Activity Racket burst)