NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

अनिश बेंद्रे

|

Updated on: Mar 17, 2021 | 10:05 AM

वसईतील कृष्णा टाऊनशीप या हायप्रोफाईल परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत होती (Vasai High Profile Sex racket)

NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक
वसईतील उच्चभ्रू परिसरात वेश्य व्यवसाय

वसई : वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क करुन आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. (Vasai High Profile Sex racket busted)

वसईतील कृष्णा टाऊनशीप या हायप्रोफाईल परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली. त्यानंतर रात्री 9 वाजता खोटे गिऱ्हाईक पाठवून या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवले आहे.

दोघींची सुटका, आरोपी महिलेला बेड्या

या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. एका आरोपी महिलेला अटक करण्यात आले आहे. नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.

रत्नागिरीतही सेक्स रॅकेटचा भांडाफोड

रत्नागिरी पोलिसांनीही काही दिवसांपूर्वी उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे भाड्याच्या बंगल्यात हे सेक्स रॅकेट सुरु होते. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेला या रॅकेट संदर्भातील टीप मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचला. यासाठी बनावट गिऱ्हाईक तयार करण्यात आले. या बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. (Vasai High Profile Sex racket busted)

रत्नागिरीत एका पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली होती, तर सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यांच्याकडून काही मोबाईल, रोख रक्कम देखील जप्त केली होती.

हिंजवडीत ऑनलाईन सेक्स रॅकेट उघड

हिंजवडी परिसरातही नुकतेच एक ऑनलाईन सेक्स रॅकेट समोर आले होते. ऑनलाईन माधम्यातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी 13 तरुणींची सुटका केली होती, तर एकाला अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी एका वेबसाईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी फोन क्रमांक ग्राहकांना पुरवत होते.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीतील उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

इंटरनेटवर नोकरीची जाहिरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

(Vasai High Profile Sex racket busted)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI