AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV : 15 दिवसांच्या बाळाला फुटपाथवर सोडणारी निर्दयी आई! म्हणून तिनं चक्क मरीन ड्राईव्हच्या फुटपाथवर बाळाला सोडलं

Mumbai Crime CCTV : मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या ही घटना समोर आली होती. 6 मे रोजी ही घटना घडली

CCTV : 15 दिवसांच्या बाळाला फुटपाथवर सोडणारी निर्दयी आई! म्हणून तिनं चक्क मरीन ड्राईव्हच्या फुटपाथवर बाळाला सोडलं
निर्दयी आईला अटकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 20, 2022 | 12:25 PM
Share

मुंबई : मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या 15 दिवसांच्या बाळाला फुटपाथ ठेवून दिलं आणि ती निघून गेली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला वाऱ्यावर सोडणारी ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौपाटीवर असलेल्या एका बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती आढळून आली होती. 15 दिवसांच्या एका बाळाला या बस स्टॉपवर एका महिलेनं बाळाला बेवारसपणे सोडून दिलं होतं. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह (Marine Drive Police) पोलिसांनी माणुसकी जपत नवजात बाळाला कुशीत घेतलं आणि त्याला पोलीस स्थानकात आणलं होतं.

पाहा व्हिडीओ :

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या ही घटना समोर आली होती. 6 मे रोजी ही घटना घडली. बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती साधारण 15 दिवसांच्या नवजात बाळाला ठेवून गेल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली. याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा ढेकळे यांनी पोलीस पथकासह जाऊन त्या नवजात बाळाला कुशीत घेतलं आणि पोलिस स्टेशन मध्ये आणलं. यानंतर बाळाला औषधोपचार करून, बाल कल्याण समितीचे आदेश घेवून आशा सदन येथे ठेवण्यात आलं.

असं का केलं महिलेनं?

नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीने या आईने 15 दिवसांच्या बाळाला फुटपाथवर सोडलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी याप्रकरणी आईला अटक केली आहे. अटकेत असलेली महिला ही मूळची बिहारची असून तिचा नवरा राजस्थान येथील अल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

पोलिसांना चर्चगेट रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला आढळून आली होती. याचा धागा पकडून पोलिसांनी पुढील तपास करत या महिलेला शोधून काढत तिला अटक केली. 22 वर्ष वय असलेल्या या महिलेचं नाव सरोज सत्यनारायण सहारण असून या महिलेचा भाऊ आणि बाळाचा मामा असलेल्या राम सेवक यादव या 28 वर्षीय इसमालाही अटक केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...