AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : ऑनलाईन ऑर्डर करताय? मग आधी हे वाचा, अन्यथा तुमच्यासोबतही होऊ शकते असे !

फेसबुकवर जाहिरात पाहून ऑनलाईन सुकामेवा ऑर्डर करणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पेमेंट करण्याच्या नावाखाली महिलेला लाखोचा गंडा घातला आहे.

Mumbai Crime : ऑनलाईन ऑर्डर करताय? मग आधी हे वाचा, अन्यथा तुमच्यासोबतही होऊ शकते असे !
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 26, 2023 | 9:02 AM
Share

मुंबई / 25 जुलै 2023 : हल्ली ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. यामुळे ऑनलाईन खरेदी करणे अनेकांना महागात पडत आहे. मुलुंडमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवरील एका ग्रुपद्वारे सुका मेवा खरेदी करणे एका 38 वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली महिलेला तब्बल 6.93 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मुलुंड पोलिसांनी फसवणुकीची तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुलुंडमधील वीणा नगर येथील रहिवासी असलेल्या महिलेला 20 जुलै रोजी “मुलुंड बाय सेल ग्रुप” या फेसबुक ग्रुपवर 40% सवलतीत सुक्या मेव्याची जाहिरात करणारी पोस्ट आली. महिलेने जाहिरातीत दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधला. यावेळी तिला 1,140 रुपयात सुका मेवा खरेदी करण्याची ऑफर देण्यात आली. तिने तात्काळ विक्रेत्यांनी दिलेल्या क्विक रिस्पॉन्स (QR) कोडवर पेमेंट केले. त्यानंतर महिलेला दोन दिवसात ऑर्डर घरपोच मिळेल असे सांगण्यात आले.

काय आहे मोडस ऑपरेंडी?

दोन दिवसांनी ऑर्डर न मिळाल्याने महिलेने तसे कळवले. यावेळी तिच्या आदेशाची पुष्टी झाली नसल्याचे महिलेला कळवण्यात आले. यानंतर महिलेने दिलेले पैसे परत मागितले. यावेळी आरोपींनी तिला क्यूआर कोड पाठवा लगेच पैसे परत येतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी चुकून तिला 10,000 रुपये अतिरिक्त पाठवल्याचा दावा केला आणि ते परत करण्यास सांगण्यात आले. त्यांनी तिला 100 रुपये पाठवून तिचा विश्वास संपादन केला. मग पुन्हा चुकून 49,000 रुपये आणि 38,450 रुपये परत पाठवल्याचा दावा केला. महिलेने सर्व पैसे परत केले. यानंतर तिच्या बँक खात्यातून एकूण 6,93,500 रुपये गेल्याचे तिला कळले, परंतु कोणतीही रक्कम जमा झाली नव्हती.

याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी तपास सुरू केला असून, ज्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले गेले त्यांचा शोध घेत आहेत. पीडितेने तिची बँक स्टेटमेंट्स सादर करत आरोपींशी केलेले सर्व व्यवहार हायलाइट केले आहेत.

Follow Us
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...