Video : कडक सॅल्यूट! स्वतःवर वार झेलत तरुणीला वाचवलं! वडाळ्यात पोलिसानं लावली जीवाची बाजी

CCTV Video : चाकू घेऊन एक इसम मुलीवर हल्ला करण्याच्या इराद्यानं निघाला होता. मुलगी हल्लेखोरापासून दूर पळत होती.

Video : कडक सॅल्यूट! स्वतःवर वार झेलत तरुणीला वाचवलं! वडाळ्यात पोलिसानं लावली जीवाची बाजी
वडाळ्यातील थरारक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 2:26 PM

मुंबई : दिवसाढवळ्या एका मुलीवर हल्ला (Attack on girl in Wadala) करण्यात आला. माथेफिरुने चाकूनं सपासप वार करण्याच्या हेतून मुलीच्या दिशेने धाव घेतली. प्रसंगावधान राखत पोलिस मध्ये पडला. चाकूचे सपासप होणारे वार आपल्या अंगावर झेलले आणि जीवाची बाजी लावत मुलीचा जीव वाचवला. ही थरारक घटना घडली आहे, मुंबईतल्या वडाळ्यात (Wadala Police CCTV Video). मुंबई पोलीस (Mumbai Police) या घटनेत जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र जे धाडस पोलीस कर्मचाऱ्यानं दाखवलं, ते पाहून काळजाचा ठोका चुकेल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या हाताल जबर जखम झाली होती. हातातून मोठ्या प्रमाणात धारदार सुऱ्यामुळे झालेल्या घावाने रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान, वडाळा पोलीस स्थानकाती या पोलीस कर्मचाऱ्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.

कुठे घडली घटना?

मुंबईच्या वडाला भागात थरार पाहायला मिलाला. वडाळ्याच्या बरकत अली नाक्यावर एका मुलीवर माथेफिरुनं हल्ला केला. चाकू घेऊन एक इसम मुलीवर हल्ला करण्याच्या इराद्यानं निघाला होता. मुलगी हल्लेखोरापासून दूर पळत होती. हे पाहून तिथे असलेल्या पोलिसानं तातडीनं मुलीच्या दिशेनं धाव घेतली. मुलीचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या या मुलीला हल्लेखोराच्या तावडीतून पोलिसानं बाजूला केलं.

हे सुद्धा वाचा

इतक्यात माथेफिरु हल्लेखोरानं पोलिसवरच धारदार चाकूनं सपासप वार केले. यात पोलिसांच्या हाताला जबर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पण या मुलीचा जीव वाचवण्यात पोलिसाला यश आलं. हल्ल्याची ही घटना पाहून आजूबाजूचे लोकही मुलीच्या दिशेनं धावले. एकच गर्दी झाली.

कुणी आणि का केला हल्ला?

हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव अनिल बाबर असल्याचं कळतंय. त्याचं वय 31 वर्ष आहे. हल्ला करण्यात आलेल्या मुलीवर त्यांच प्रेम होतं. प्रेमप्रकरणातूनच अनिलने हा हल्ला केला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा थरारक घटना :

पाहा राज्यातली महत्त्वाची बातमी :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.