AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! AC दुरुस्त करायला आलेल्याचा 5 वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार

नवी मुंबई येथील तळोजा येथील धक्कादायक प्रकार! कशी उघडकीस आली घटना? वाचा सविस्तर

धक्कादायक! AC दुरुस्त करायला आलेल्याचा 5 वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार
संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 11:38 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईच्या तळोजा इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका इमारतीच्या लिफ्टमध्ये नराधमाने 5 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य केलं. याप्रकरणी इमारतीमधील लोकांनी तत्काळ नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तळोजा पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला आहे.

तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तळोजा फेज एक येथील एका इमारतीच्या आवारात लैंगिक अत्याचाराची घटना घडली. पीडित मुलगी घरी आल्यावर उलट्या करु लागली होती. त्यावेळी तिच्या आईला शंका आली असता सदर घटना उघडकीस आली.

यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी लगेचच या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यामुळे आरोपीच्या लगेचच मुसक्या आवळण्यात आला. आरोपी एसी रिपोरिंगचं काम करत असून त्याचं वय 19 वर्ष आहे. संध्याकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान, ही घटना घडली.

आरोची नराधम अख्तर हुसेन खान हा एसी रीपेरिंगचं काम करण्यासाठी आला होता. तो काम करुन खाली आला असता त्याची नजर पार्किंग परिसरात खेळणाऱ्या एका 5 वर्षांच्या मुलीवर पडली. आजूबाजूला कुणी नाही हे पाहून तो या मुलीला लिफ्टमध्ये घेऊन आला. लिफ्टमध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं.

तिसऱ्या मजल्यावर या मुलीला सोडल्यावर ही मुलगी घरी गेली. घरी गेल्यावर या मुलीला उलट्या झाल्या. तेव्हा या मुलीच्या आईने तिला विचारणा केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.

लगेचच मुलीचे आईवडील खाली आले. आरोपी पळून जात असताना त्याची ओळख पटवून त्याला सुरक्षा रक्षकाने ताब्यात घेतलं आणि नंतर पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. एसी रीपेरिंगचं काम करणारा अख्तर हुसेन हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून त्याने याआधीही अशा प्रकारे गैरकृत्य केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जाते आहे.

या घटनेमुळे डिलिव्हरी बॉयचं काम कऱणारे, बाहेर येणारे आणि अनोळखी व्यक्तींबाबत सावधानता बाळगण्याची नितांत गरज असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. त्या दृष्टीने सतर्कता बाळगण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.