Imtiaz Kharti : बॉलिवूडमधील सर्वात बडा मासा गळाला, NCB ची इम्तियाज खत्रीवर धाड

| Updated on: Oct 09, 2021 | 9:44 AM

एनसीबीने मुंबईत पुन्हा छापेमारी केली. NCB ने बॉलिवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. वांद्रे परिसरात छापेमारीला सुरूवात झाली.

Imtiaz Kharti : बॉलिवूडमधील सर्वात बडा मासा गळाला, NCB ची इम्तियाज खत्रीवर धाड
imtiaz Kharti
Follow us on

मुंबई : कॉर्डिला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. कारण एनसीबीने मुंबईत पुन्हा छापेमारी केली. NCB ने बॉलिवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. वांद्रे परिसरात छापेमारीला सुरूवात झाली. मुंबई-गोवा क्रूझ पार्टीत अटक करण्यात आलेल्या अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर छापेमारीला सुरुवात झाली. एनसीबीची एक टीम वांद्रे परिसरात आहे.

2 ऑक्टोबरला एनसीबीने कॉर्डिला शिपवर छापेमारी करुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेऊन अटक केलं. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात नाव

सीबीआय सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास प्रत्येक बाजूने करत आहे. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली होती. या दरम्यान इम्तियाजबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सुशांत आणि इम्तियाजचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा इम्तियाज गायब झाला होता, त्यानंतर त्याचा संशय बळावला होता.

कोण आहे इम्तियाज खत्री? 

  • इम्तियाज खत्री हा बॉलिवूडमधील नामांकित निर्माता आहे
  • त्याने हिंदीसह मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे
  • सुबोध भावेचा हृदयांतर या सिनेमाची निर्मिती केली आहे
  • इम्तियाज खत्री हे नाव सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात होतं
  • बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात इम्तियाज खत्री यांचं नाव आहे

आर्यन खान जेलमध्ये 

मुंबई ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तीन आरोपींचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काढावे लागणार आहेत. काल दुपारीच आर्यन खानची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे दहशतवादी अजमल कसाबला ज्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं, त्याच कारागृहात आर्यन खानची रवानगी करण्यात आली आहे.

आर्यन खानसह दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. काल आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.

संबंधित बातम्या  

ज्या जेलमध्ये कसाबला ठेवलं, संजय दत्त राहीला, तिथंच आता आर्यन खानची रवानगी, कशी आहे आर्थर रोड जेल?

आर्यन खान, मुक्काम-आर्थर रोड जेल, बराक क्रमांक 1, दिनचर्या कशी असणार? वाचा सविस्तर