AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Case: शाहरुखच्या पोराचा जामीन अर्ज फेटाळला, आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार? पर्याय काय आहेत?

मुंबई ड्रग्स केस प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज किल्ला कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलाय. त्यामुळे आर्यन खानला अजून किमान दोन रात्री तरी तुरुंगातच काढाव्या लागण्याची शक्यता आहे.

Aryan Khan Case: शाहरुखच्या पोराचा जामीन अर्ज फेटाळला, आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार? पर्याय काय आहेत?
आर्यन खान
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 5:38 PM
Share

मुंबई : मुंबई ड्रग्स केस प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज किल्ला कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलाय. त्यामुळे आर्यन खानला अजून किमान दोन रात्री तरी तुरुंगातच काढाव्या लागण्याची शक्यता आहे. आज आर्यन खान याच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तीवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. पण किला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. (Court rejected the bail pleas of Aryan Khan, Defendants’ lawyers prepare to go to sessions court)

आर्यनच्या वकिलांचा युक्तिवाद

किल्ला कोर्टात आज तब्बल पाच तास सुनावणी चालली. मात्र, एनसीबीच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर या कोर्टात जामिनासाठी अर्ज करणं योग्य नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. आर्यन खानसाठी सतीश माने-शिंदे यांनी केलेल्या युक्तीवादात आर्यनकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळालं नाही, व्हॉट्सअप चॅट त्याला पोलीस कोठडी सुनावण्यासाठी पुरेसं नाही म्हणूनच त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच आर्यन खान भारताबाहेर जाणार नाही. तपासाला पूर्ण सहकार्य करेल, असं म्हटलं. मात्र, कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

वकिलांचं पुढचं पाऊल काय असणार?

आज किल्ला कोर्टानं जामीन अर्ज फेटाळ्यानंतर आता आर्यन खानच्या वकिलांकडून सेशन्स कोर्टात जामीनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोर्टाच्या आदेशाची कॉपी मिळाल्यानंतरच आर्यन खानचे वकील सेशन्स कोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला एक किंवा दोन दिवस लागण्याची शक्यता वकिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आर्यन खानसह 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी

दरम्यान, आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल कोर्टात झालेल्या युक्तिवादावेळी वकील माने-शिंदे यांनी आर्यन खान यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नाही. आर्यनला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी न्यायालयाला विनंती केली. या सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील तसेच आर्यन खान आणि इतर आरोपीची बाजू मांडणारे वकील यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आर्यनला आधी एक दिवस नंतर तीन दिवस कोठडी

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर आर्यनला पहिल्यांदा एक दिवस आणि नंतर तीन दिवस असे एकूण चार दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. कालही एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खानसह इतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

इतर बातम्या :

Aryan Khan drug case | आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, तब्बल अडीच तास युक्तिवाद, दिलासा नाहीच !

‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

Court rejected the bail pleas of Aryan Khan, Defendants’ lawyers prepare to go to sessions court

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.