एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक

| Updated on: Jul 17, 2021 | 11:00 PM

मागील अनेक महिन्यांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडकेबाज कारवाई ड्रग माफियांवर सुरु आहे. मुंबई पोलिसांची अँटी नार्कोटिक्स सेलसुद्धा सक्रिय आहे. त्यामुळे ड्रग माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना सुरक्षित जागा मिळत नाही.

एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक
एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक
Follow us on

मुंबई : गेले काही दिवस एनसीबीची ड्रग्जच्या विरोधात धडक कारवाई सुरु आहे. ड्रग्ज तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीही ड्रग्ज माफियांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु आहे. मुंबईमध्ये एनसीबीमार्फत गेल्या अनेक महिन्यांपासून झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात सतत कारवाई सुरू आहे. दक्षिण मुंबईमध्ये अनेक ड्रग कारखाने उध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ड्रग माफिया किंवा पेडलर्स हे धार्मिक स्थळांच्या आड ड्रग्जचा धंदा करत असल्याचे उघड झाले आहे. (NCB’s crackdown; Marijuana, cannabis seized, five accused arrested)

धार्मिक स्थळांच्या आड ड्रगची विक्री

एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अंधेरी मरोळ मरोशी रोडवर स्थित एका मंदिरातून 3 किलो गांजा जप्त करण्यात आला. मंदिराच्या आतून ड्रग विक्रीचा काळा धंदा सुरू होता. लोक तेथून गांजा खरेदी करत होते. यामध्ये आरोपीचे नाव सुनील फुंडकर असून तो ड्रग व्यवसाय करीत होता. मात्र एनसीबीची टीम जेव्हा तिथे कारवाई करण्यासाठी गेली तेव्हा लोकांच्या विरोधाचा सामनाही करावा लागला. मात्र एनसीबी अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई केली आणि तेथून 3 किलो गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.

तरुण पिढी टार्गेटवर

काही दिवसाआधी माहिममध्ये एका दर्ग्याच्या पाठीमागे ड्रग विक्रीचे मोठे रॅकेट एनसीबीमार्फत उघड केले होते. टीम एनसीबीमार्फत माहिममधून एका ड्रग पेडलरला अटक करण्यात आली होती. हा ड्रग पेडलर आणि त्याचे साथीदार लहान मुलांना ड्रग्सच्या व्यसनाधीन बनवित होते. मात्र दर्ग्याच्या पाठीमागे ड्रग्स व्यवसाय सुरु करून पोलीस आणि इतर तपास यंत्रणेच्या जाचापासून लपण्याचा प्रयत्न करत होते.

एवढंच नव्हे तर मुंबईत दादरमधील एका गुरुद्वाराच्या आत असलेल्या लॉजमध्ये रूम बुक करून तेथून चरस(हशीस)ची विक्री करणाऱ्या 4 आरोपींना एनसीबी अधिकाऱ्यांनी मागील जून महिन्यात अटक केली होती आणि त्यांच्याकडून 2 किलो चरस आणि जवळपास 2 लाख 20 हजार रुपए रोख जप्त करण्यात आली होती.

कारवाई होऊ नये म्हणून नवा फंडा

मागील अनेक महिन्यांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडकेबाज कारवाई ड्रग माफियांवर सुरु आहे. मुंबई पोलिसांची अँटी नार्कोटिक्स सेलसुद्धा सक्रिय आहे. त्यामुळे ड्रग माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना सुरक्षित जागा मिळत नाही. अनेक ड्रग माफिया हे धार्मिक स्थळाच्या अवती भोवती ड्रग्स विक्री करताना आढळले आहेत. आपल्यावर कारवाई होणार नाही किंवा कोणाला माहिती मिळणार नाही अशी अपेक्षा बाळगून काही ड्रग माफिया किंवा पेडलर्स हे ड्रग विक्रीसाठी धार्मिक स्थळ किंवा धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला ड्रग विक्री करत आहेत. मात्र तपास यंत्रणा सक्रिय आहे. जर कोणी असं करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच होणार, असा इशारा एनसीबीतर्फे देण्यात आला आहे. (NCB’s crackdown; Marijuana, cannabis seized, five accused arrested)

इतर बातम्या

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर उपासमारीची वेळ, तात्काळ आर्थिक मदत द्या; प्रविण दरेकरांची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश