Kalyan Crime News: ‘शिवसेनेत खूप उडतोयस’ असं म्हणत कल्याण उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला! हर्षवर्धन पालांडे जखमी

Shiv sena News : बुधवारी सकाळी ही घटना घडली.

Kalyan Crime News: 'शिवसेनेत खूप उडतोयस' असं म्हणत कल्याण उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला! हर्षवर्धन पालांडे जखमी
हल्लामध्ये शिवसैनिक जखमी
Image Credit source: TV9 Marathi
सुनील जाधव

| Edited By: सिद्धेश सावंत

Jul 20, 2022 | 1:28 PM

कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan Crime News) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास कल्याणच्या उपजिल्हा प्रमुखावर अज्ञातांनी हल्ला केली. शिवेसनेत खूप उडतोयस असं म्हणत अज्ञात हल्लेखोरांनी कल्याणच्या शिवसेना (Kalyan Shivsena News) उपजिल्हा प्रमुखावर हल्ला चढवला बुधवारी सकाळी ही घटना घडली. कल्याण पूर्वेतील संतोषी माता रोड परिसरात हा हल्ला रण्यात आला. यावेळी तीन ते चार अज्ञात इसमांनी येत हर्षवर्धन पालांडे (Harshvardhan Palande) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. धारदार शस्त्राने वार करत पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पालांडे यांना नंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करणयात आलं. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कल्याणमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या हर्षवर्धन पालांडे यांच्या बोटाला या अपघातामध्ये दुखापत झाली आहे. तलावर आणि लोखंडी रॉडने हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. थोडक्यात या हल्ल्यामधून हर्षवर्धन पालांडे हे वाचले. आता हा हल्ला नेमका कुणी केला होता? की कुणी घडवून आणला होता? यावरुन तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे समर्थक असून त्यांनी शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर महेश गायकवाड यांनी मात्र आरोपांचं खंडन केलंय. ‘हल्ला दुर्दैवी मात्र माझा काडीमात्र संबंध नाही, पोलिसांनी तपास करत कारवाई करावी, माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागू’ असा महेश गायकवाड यांनी इशारा दिला आहे. दरम्यान घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत

गाडीतून जाताना हल्ला

बुधवाी सकाळी हर्षवर्धन पालांडे हे कल्याण पूर्वेतून संतोषी माता रोड परिसरातून गाडीतून जात होते. त्यावेळी तीन ते चार अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे पालांडे यांच्या हाताला दुखापत झाली. तलावारीसह लोखंडी रॉडने हल्ला केला होता. राजकीय स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे.

भायखळ्यातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला

दरम्यान काही दिवासंपूर्वीत भायखळ्यातही अज्ञातांनी शिवसेनेच्या दोघा कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. बाईकवरुन येत धारदार तलवारींच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला होता. स्विफ्ट गाडीवर रात्रीच्या सुमारास झालेल्या शिवसैनिकांवरील हल्ल्यानंतर पोलिस संरक्षण दिलं जावं, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यानंतर आता कल्याणमध्येही आणखी एका शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी : पाहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेती अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा आणि शहर पातळीवरील अंतर्गत स्पर्धाही आता चर्चेचा विषय ठरु लागली आहे. त्यातही एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरेंचं समर्थक असाही सामना सुरु असून शिवसेनेसमोरची आव्हानंही दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें