धक्कादायक! मिरा रोड परिसरातून 8 पिस्तूल जप्त; आरोपीला अटक

मिरा रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नयानगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी एका 48 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 पिस्तूल, 8 मॅगजिन आणि 14 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.

धक्कादायक! मिरा रोड परिसरातून 8 पिस्तूल जप्त; आरोपीला अटक
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 3:10 PM

मुंबई : मिरा रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नयानगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी एका 48 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 पिस्तूल, 8 मॅगजिन आणि 14 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना नयानगर परिसरात हा व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळू आला होता. त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीची विचारपूस केली, त्याने उडाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.

आरोपी मुळ मध्यप्रदेशातील रहिवासी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीला नयानगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 8 पिस्तूल, 8 मॅगजिन आणि 14 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी हा मूळ मध्यप्रदेशमधील रहिवासी आहे. तो ही शस्त्रे विकण्यासाठी मिरा रोड परिसरात आला होता अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. आरोपीने ही शस्त्रे कुठून आणली? ती तो कोणाला विकणार होता, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मध्यप्रदेशमधील धाब्यावरही लपवले होते पिस्तूल

दरम्यान याच आरोपीने काही पिस्तूल आणि काडतूसे मध्यप्रदेशमधील एका धाब्यावर लपवल्याचे देखील चौकशीत समोर आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित धाबा गाठत ही शस्त्रे ताब्यात घेतली आहेत. आरोपीने ही शस्त्रे कोठून आणली होती, तो ती मुंबईमध्ये कोणाला विकणार होता, आरोपीचा अन्य कोणी साथिदार आहे का? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितेले.

संबंधित बातम्या

एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

Pune crime | पुणे पोलिसात खळबळ ! फरासखाना पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यानेच दिली दत्तवाडीतील पोलिसाच्या गेमची सुपारी ; वाचा संपूर्ण घटना