युट्यूबवर पाहून नोटा छापायचं प्रशिक्षण घेतलं, चलनात आणण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी पकडले !

| Updated on: Sep 17, 2022 | 6:15 PM

आरोपी रोहितचं बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने युट्युबवर नोटा कशा छापायच्या याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने मानखुर्द परिसरात एका खोलीत या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.

युट्यूबवर पाहून नोटा छापायचं प्रशिक्षण घेतलं, चलनात आणण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी पकडले !
बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / अविनाश माने (प्रतिनिधी) : बनावट नोटा (Fake Notes) छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गुन्हेगारास मानखुर्द पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. मानखुर्दच्या ज्योतिर्लिंग नगर परिसरामध्ये एका खोलीत बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पाच दिवस या परिसरात पाळत ठेवून आज पहाटे या घरावर छापा (Raid) टाकण्यात आला. यावेळी रोहित शहा या 22 वर्षे तरुणाला नोटा छापताना रंगेहाथ पोलिसांनी अटक (Arrest) केली.

एकूण 7 लाखाच्या नोटा जप्त

या धाडीमध्ये 50, 100 आणि 200 रुपयांच्या 7 लाख 16 हजार 150 रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. यासोबतच नोटा छापण्यासाठी लागलेले प्रिंटर्स, स्कॅनर्स, कलर्स, लॅपटॉप असा मिळून 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आरोपी सुशिक्षित असून युट्यूबवर घेतलं नोटा छापण्याचं प्रशिक्षण

आरोपी रोहितचं बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने युट्युबवर नोटा कशा छापायच्या याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने मानखुर्द परिसरात एका खोलीत या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

बनावट नोटा छापण्याबाबत मानखुर्द पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 4-5 दिवस सतत सदर खोलीवर पाळत ठेवली होती. यानंतर आज पहाटे पोलिसांनी या खोलीत छापा टाकला आणि आरोपीला रंगेहाथ पकडले.

आरोपीला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

रोहित या परिसरात नेमक्या किती दिवसांपासून नोटा छापण्याचा गोरख धंदा करत होता आणि आतापर्यंत किती नोटा त्याने चलनात आणल्या, या संदर्भात अधिक तपास मानखुर्द पोलीस करत आहेत. आरोपीला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी कोठवण्यात आली आहे.