AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओरिजनल आयफोन दाखवायचे अन् डुप्लिकेट विकायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच !

शॉपिंग मॉल किंवा हायप्रोफाईल परिसरात जायचे आणि खरा आयफोन दाखवून डुप्लिकेट आयफोन स्वस्तात विकायचे. पण अखेर भांडाफोड झाला.

ओरिजनल आयफोन दाखवायचे अन् डुप्लिकेट विकायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच !
डुप्लिकेट आयफोन विकणारी टोळी अटकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 10, 2023 | 10:12 PM
Share

गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : खरा आयफोन दाखवून डुप्लिकेट आयफोन विकणाऱ्या टोळीला पकडण्यास दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. ही टोळी मुळची उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असून, मुंबईत विविध ठिकाणी डुप्लिकेट मोबाईल आयफोन विकायची. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या टोळक्याला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. आदिल अहमद, शमी अहमद, अहमद नवाज समीम अहमद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख डुप्लिकेट आयफोन आणि इतर अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या दिंडोशी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

30 हजारात डुप्लिकेट मोबाईल विकायचे

अटक केलेले आरोपी आयफोन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना हेरायचे. त्यांना खरा आयफोन दाखवायचे. मग आपल्याकडील डुप्लिकेट मोबाईल खरे सांगून चॉईस करण्यास सांगायचे. यानंतर ग्राहकाने पसंत केलेला मोबाईल 30 हजार रुपयात त्याला विकायचे. अशाच प्रकारे या आरोपींनी तक्रारदाराला ओबेरॉय मॉलजवळ खरा आयफोन दाखवून 30 हजार रुपयांना डुप्लिकेट आयफोन विकला होता. मात्र हा आयफोन डुप्लिकेट असल्याचे लक्षात येताच सदर व्यक्तीने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

तीन दिवस सापळा रचून केली अटक

दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस या टोळीचा कसून शोध घेत होती. तब्बल 3 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही टोळी मुंबईतील नागपाडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 3 दिवस पोलिसांनी नागपाडा परिसरात सापळा रचून आरोपींना अटक केली. हे आरोपी अशा प्रकारे आंध्र प्रदेश, बेंगळुरूसह देशातील विविध राज्यात लोकांना फसवणूक करत होते. हे सर्व आरोपी मेरठ उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आणि नोएडा येथून डुप्लिकेट आयफोन आणत होते. हे लोक आयटी हब मॉल शॉपिंग सेंटर किंवा हायप्रोफाईल भागात जाऊन लोकांना आयफोन दाखवून डुप्लिकेट आयफोन विकायचे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?