AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aftab Shivdasani : अभिनेता आफताब शिवदासानी याला बसला ऑनलाइन फ्रॉडचा फटका, खात्यातून लाखो रुपये गायब !

Aftab Shivdasani : ऑनलाइन फसवणूकीचे अनेक गुन्हे सध्या समोर येत आहेत. अभिनेता आफताब शिवदासानी हाही या फसवणूकीला बळी पडला असून त्याला मेहनतीची कमाई गमवावी लागली. त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Aftab Shivdasani : अभिनेता आफताब शिवदासानी याला बसला ऑनलाइन फ्रॉडचा फटका, खात्यातून लाखो रुपये गायब !
| Updated on: Oct 10, 2023 | 10:59 AM
Share

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : ऑनलाइन माध्यमातून लोकांना आमिष दाखवून किंवा बोलण्यात फसवून, त्यांना गंडा घालत पैसे लुबाडण्याची अर्थात सायबर फ्रॉडची ( cyber fraud) अनेक प्रकरणे समोर येत आहेत. कधी जास्त पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला सांगतात. तर कधी बँकेच्या नावाखाली बनावट कॉल करून लोकांकडून महत्वाची माहिती घेत त्यांचे पैसे लुबाडतात. ऑनालाइन फ्रॉड (online fraud) करणारे चलाख गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना ठगवत त्यांची मेहनतीची कमाई लांबवतात. अनेक सामान्य नागरिक या प्रकारांना बळी पडतात. अशीच एक घटना सुप्रसिद्ध बॉलिवूडड अभिनेता आफताब शिवदासानी ( Actor Aftab Shivadasani) याच्यासोबत देखील घडली असून त्याला लाखोंचा फटका बसला.

ऑनलाइन फ्रॉडमध्ये अभिनेता आफताब शिवदासानी याने सुमारे 1.50 लाख रुपये गमावले आहेत. या ऑनलाइन फसवणूकीप्रकरणी त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय झालं ?

8 ऑक्टोबर रोजी आफताब याला त्याच्या ॲक्सिस बँकेच्या अकाऊंट सस्पेन्शनसंदर्भात एक मेसेज आला होता. पॅन कार्ड डिटेल्स मिसिंग असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. तसेच त्या मेसेजमध्ये एक लिंकही ॲटॅच करण्यात आली होती. अधिक माहितीसाठी त्या लिंकवर क्लिक करावे, असे त्यात लिहीले होते.

आफताबने त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आणि आपण ॲक्सिस बँकेचा कर्मचारी बोलत आहोत, असा दावा कॉलरने केला. त्याने आफताबला ती लिंक ओपन केल्यानंतर आलेल्या पेजवर अकाऊंटसंदर्भातील (संवेदनशील) माहिती टाकण्यास सांगितले . मात्र तसे करताच त्याच्या अकाऊंटमधील 1,49,999 रुपये डेबिट झाले.

पोलिसांत घेतली धाव

मात्र पैसे डेबिट झाल्याचे समजताच, काहीतर गडबड असल्याचे आफताबच्या लक्षात आले. सोमवारी ( ९ ऑक्टोबर) त्याने बँक मॅनेजरशी संपर्क साधला असता, त्यांनी त्याला डेबिट झालेल्या पैशांसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. आफताबने वांद्रे पोलिस स्टेशन येथे धाव घेऊन तेथील अधिकाऱ्यांसमोर सर्व प्रकार कथ केला आणि दोन अज्ञात व्यक्तींविरोधात फसणूकीची तक्रार नोंदवली. त्यानुसार वांद्रे पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी आयपीसी कायद्याच्या कलम 419 आणि 420, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.