AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉयलेटमध्ये सापडली मृत नवजात बालिका, सायनमधील रुग्णालय हादरलं

मुंबईतील सायन रुग्णालय एका धक्कादायक प्रकाराने हादरलं आहे. सायन रुग्णालयातील टॉयलेटमध्ये एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

टॉयलेटमध्ये सापडली मृत नवजात बालिका, सायनमधील रुग्णालय हादरलं
| Updated on: Dec 09, 2023 | 10:25 AM
Share

ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 डिसेंबर 2023 : मुंबईतील सायन रुग्णालय एका धक्कादायक प्रकाराने हादरलं आहे. सायन रुग्णालयातील टॉयलेटमध्ये एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. जन्मत:च त्या मुलीला रुग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्यात फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवजात बालिका टॉयलेटमध्ये सापडल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. डॉक्टरांच्या टीमने धाव घेऊन तातडीने तिची तपासणी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच सायन पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील काम करणाऱ्या सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे ( वय 36) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 8 डिसेंबर रोजी डोंगरे या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या. त्यानंतर सकाळी पावणे सातच्या सुमारास त्या रुग्णालयातील अपघात विभागातील टॉयलेटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी गेल्या. मात्र तेव्हा त्यांना तेथे असलेली कचऱ्याची बादली नेहमीपेक्ष खूपच जड वाटली. म्हणून त्यांनी ती नीट उघडून पाहिली असता, त्यात एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये नवजात अर्भक आढळले.

समोरचे दृश्य पाहून त्या हादरल्याच. त्यांनी या गोष्टीची माहिती तातडीने त्यांच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी त्या नवजात बाळाला बाहेर काढून तातडीने तिची तपासणी केली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. त्या नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती शीव पोलिसांना दिली. मुलीचा घातपात केला का? कोणी केला? कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी शीव पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना