जश्शी आहेच तश्शी हुशार… चपलेच्या वासावरून आरोपी पकडला, साडी नेसून… पोलिसांनी व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील जेसी नावाच्या कुत्र्याने अनेक गुन्हे उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बँक दरोड्यापासून ते अपहरण प्रकरणांपर्यंत, जेसीने आपल्या वासाच्या तीक्ष्णतेने आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत केली आहे. गर्दीत हरवलेल्या मुलाचा शोध लावणे आणि 5 किमी अंतर पार करून आरोपीपर्यंत पोहोचणे हे जेसीच्या कामगिरीतील काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

जश्शी आहेच तश्शी हुशार... चपलेच्या वासावरून आरोपी पकडला, साडी नेसून... पोलिसांनी व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
'जेसी'ची अनोखी कामगिरी
Image Credit source: social media
| Updated on: Jul 07, 2025 | 10:59 AM

पोलीस दलातील किंवा सैन्यातील श्वान पथकं वासावरून आरोपीला पकडतात किंवा ते आरोपी जिथे जिथे लपलेले असतात, हे श्वान पोलिसांना तिथपर्यंत नेण्याचं काम करतात. सीआयडी सारखी एखादी मालिका असो किंवा मग एखादा चित्रपट, आपण बऱ्याचदा असे सीन पाहिल असतीलच. किंवा वर्तमानपत्रांमधून अशा बातम्या आपण वाचल्या असतीलच. आपल्या , सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस जितकं कसून काम करतात ना, तितंकच पोलीस दलातील या श्वानांचही महत्वाचं योगदान असतं.

अशाच मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील ‘जेसी’ नावाच्या एका श्वानाच्या कामगिरीची माहिती पोलिसांनी नुकतीच शेअर केली असून त्याने श्वानाने आत्तापर्यंत उत्तम कामगिरी करत एकाहून एक गंभीर आणि जटील अशा गुन्ह्यांचाही शोध लावला आहे. एवढंच नव्हे तर या श्वानाच्या कामगिरीची माहिती देणारा एक व्हिडीओदेखील मुंबई पोलिसांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. काय आहे या श्वानाची कामगिरी, चला जाणून घेऊया.

श्वान पथकाचे सामर्थ्य काय ?

एका श्वान पथकाचे सामर्थ्य काय असू शकते याचा तुम्ही विचार केला आहे का ? चोरी, खून, दरोडा किंवा अजून काही… एखादा गुन्हा घडला की आपण पोलिसांकडे धाव घेतो. त्यांचे ट्रेन ऑफिसर्स अशा गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना हूडकून त्यांना बेड्या ठोकत योग्य ती शिक्षा करतातच. पण त्यांच्यासोबतच अशा गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी काही वेळा श्वान पथकंही कार्यरत असतात. फक्त एका चपलेवरून बँकेतील भयानक चोरी आणि खुनाचा मागोवा घेत तपास करणे किंवा साडी नेसून लपलेला आरोप शोधणं, एवढंच नव्हे गणपती विसर्जनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीतून एका टॅक्सीचा माग काढत हरवलेल्या मुलाला शोधन काढणं… या सगळ्या गुन्ह्यांच्या छडा लावला तो मुंबई पोलिस दलातील ‘जेसी’ या श्वाानाने.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या चार वर्षांत जेसीन मुंबई पोलिस दलात असंख्य कामगिरी पार पाडल्या असून गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचा महत्वाचा वाटा बजावला आहे. त्यातील एक महत्वाचा गुन्हा होता बँक चोरीचा. एमएचबी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका बँकेत मोठा दरोडा पडला होता आणि खूनही झाला होता. पोलिसांना तिथे आरोपीची एक चप्पल सापडली. पोलिस श्वान जेसीला त्या चपलेचा वास देण्यात आला, त्यानंतर मेंन मार्केटचा जो परिसर आहे तिथून शोध घेत, रास्ता काढत काढत छोट्या गल्ल्यांमधून जात आरोपी ज्या चाळीत लपला होता,तिथपर्यंत 5 किमी अंतर पार करून या श्वानाने पोलिसांना तिथपर्यंत पोहोचवलं. ज्या रूममध्ये तो होता, तिथे जेसी गेली आणि बाहेर उभी राहून भुंकू लागली. अखेर पोलिसांनी आत घुसत त्या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या आणि मोठ्या गुन्ह्याचा छडा लागला.

 

गर्दीतून लावला अपहरण झालेल्या चिमुकल्याचा शोध

एवढंच नव्हे तर मालवणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका छोट्याशा मुलाचं अपहरण झालं होतं. तिथेही प्रचंड गर्दी असतानासुद्धा जेसी या श्वानाने शोध घेत रस्ता काढला आणि आरोपीने ज्या ठिकाणाहून टॅक्सीने पुढे गेला ते ठिकाण पोलिसांना दाखवलं. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता, त्यांना आरोपी दिसला आणि त्यावरून त्या व्यक्तीला अटक करून अपहरम झालेल्या चिमुकल्याचीही सुटका करण्यात आली. अशा पद्धतीने पोलिसांचे श्वान पथक नेहमीच बारकाईने गुन्हेगारांचा तपास करत त्यांना शोधू काढतं. पोलिस दलातील या श्वानांचे जेवढे कौतुक करावे, ते कमीच !