Mumbai crime : किकी आणि पुकी.. प्रेमाची नावं, मला पत्नीच समजायचा; अल्पवयीन विद्यार्थ्याच्या शोषणाचा आरोप असलेल्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा

मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेवर अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली होती. मात्र, आता शिक्षिकेने कोर्टात विद्यार्थ्याकडून मिळालेली प्रेमपत्रे आणि चॅट सादर करून, विद्यार्थी तिच्या प्रेमात होता, असा दावा केला आहे. यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे आणि जामीनाची मागणी करण्यात आली आहे.

Mumbai crime :  किकी आणि पुकी.. प्रेमाची नावं, मला पत्नीच समजायचा; अल्पवयीन विद्यार्थ्याच्या शोषणाचा आरोप असलेल्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
| Updated on: Jul 12, 2025 | 11:05 AM

मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत गैरव्यवहार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपा करण्यात आला होता. याप्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली होती. वेगवेगळया फईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन जवळजवळ वर्षभर ती महिला त्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करत होती अशी माहिती समोर आली होती. एवढंच नव्हे तर तिने त्या मुलाला मद्य द्यायची तसेच नैराश्याविरोधी औषधे देत असे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमकुवत झाली असा दावाही करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाचे शोषण करणाऱ्या त्या महिलेला अटक करण्यात आली.

मात्र आता याच प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. तो विद्यार्थीच माझ्या प्रेमात होता, असा दावा त्या महिलेने केला आहे.

तो माझ्या प्रेमात, मला पत्नी म्हणायचा..

अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंग कोर्टात सादर केले. तो विद्यार्थीच माझ्या प्रेमात होता असे सांगत, तसे पुरावे शिक्षिकेकडून कोर्टात सादर करण्यात आले असून जामीनासाठा अर्जही करण्यात आला. विद्यार्थ्याने केलेले इमेल्स, प्रेमपत्र, गिफ्ट आणि व्हॉट्सअप चॅटिंग हे आरोपी शिक्षिकेने कोर्टात सादर केले.

मी त्या विद्यार्थ्यासोबत तात्पूरत्या प्रेमसबंधात होतो. एवढंच नव्हे तर तो अल्पवयीन विद्यार्थी तिला पत्नी असे म्हणायचा असे शिक्षिकेने कोर्टात आपल्या अर्जात म्हटले आहे. किकी आणि पुकी या नावाने मला बोलवायचा असे मेसेज आरोपी शिक्षिकेने कोर्टात सादर केलेले आहेत. यामुळे याप्रकरणाला आत नवंच वळण लागलं आहे.

काय आहे प्रकरण ?

देशातील टॉप पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील अतिशय प्रतिष्ठत शाळेतील एका शिक्षिकेवर गंभीर आरोप करण्यात आला. या शाळेतील शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यावर अत्याचार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी करत तक्रार दाखल केली. आहे. ती महिला शिक्षिका गेल्या वर्षभरापासून त्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती . आणि ही अत्यंत अश्लील घटना कोणत्याही सुनसान जागी नव्हे तर शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणला आणि त्याला इतके दिवस गप्प बसवले. एवढंच नव्हे तर ती त्याला मद्य द्याचीच तसेच नैराश्याविरोधी औषधे देत असे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमकुवत होत होती. तो भीतीच्या सावटाखाली आणि संकोचून जगत होता. मात्र त्याने कशीबशी हिंमत करत पालकांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तिच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्या शिक्षिकेला बेड्या ठोकल्या. मात्र आता शिक्षिकेने कोर्टात सादर केलेले पुरावे आणि प्रेम असल्याचा दावा यामुळे या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आलेला आहे.