Crime News | धक्कादायक! व्याज फेडलं नाही म्हणून महिलेवर बलात्कार

महिलेने कशासाठी उधारीवर घेतले होते पैसे?. माणूसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना घडली आहे. मेहरदीन व्याजावर पैसे देतो, असं कोणीतरी महिलेला सांगितलं होतं.

Crime News | धक्कादायक! व्याज फेडलं नाही म्हणून महिलेवर बलात्कार
ताडदेव परिसरात चोरीदरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 12:40 PM

जयपूर : माणूसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे. एक महिलेने पॅरालिसिस झालेल्य पतीच्या उपचारासाठी पैसे उधारीवर घेतले होते. या महिलेला घेतलेले पैसे फेडता आले नाहीत, म्हणून कर्ज देणाऱ्याने महिलेवर बलात्कार केला. त्याने या प्रसंगाचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. राजस्थानच्या नागौरमध्ये माणूसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना घडली आहे.

महिला पतीच्या उपचारासाठी पैसा गोळा करत होती. पण पैशाची व्यवस्था झाली नाही. त्यानंतर महिलेने नागौर येथे दिल्ली दरवाजाजवळ राहणाऱ्या मेहरदीनशी संपर्क साधला. मेहरदीन व्याजावर पैसे देतो, असं कोणीतरी महिलेला सांगितलं होतं.

पती बाहेर होता तेव्हा तो घरी आला

महिला मेहरदीनकडे गेली. त्याच्याकडून 10 हजार रुपये उधारीवर घेतले. महिलेने मेहरदीनला 5 हजार रुपये परत केले. ती दर महिन्याला 500 रुपये द्यायची. एक दिवस पती बाहेर गेला होता. त्यावेळी मेहरदीन महिलेच्या घरी आला. त्याने तिच्यावर बलात्कार केला व व्हिडिओ बनवला.

हॉटेल रुममध्ये बलात्कार

मेहरदीन जोधपूरला महिलेला घेऊन गेला. तिथे तिच्यावर हॉटेल रुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार सर्वांना समजल्यानंतर महिलेने तलावात उडी मारुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी महिलेला वाचवलं. व्हिडिओ बनवून व्हायरल

सगळ्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. नागौर कोतवालीचे सीआयए रमेंद्र सिंह हाडा म्हणाले की, महिलेने रिपोर्ट दिला आहे. तिने एका युवकाकडून काही पैसे उधारीवर घेतले होते. तिने पैसे परत केले. पण व्याजासाठी तिला त्रास देण्याचा प्रकार सुरु होता. तिच्यावर बलात्कार केला. नंतर याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलं. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केलीय.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.