Nagpur Crime : विद्युत विभागाच्या गोडाऊनमधून चोरला लाखोंचा माल, पोलिसांनी अशा आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

मनपाच्या विद्युत विभागाच्या गोडाऊनमधून चोरलेला लाखोंचा माल पोलिसांनी शोधला असून याप्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकून अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime : विद्युत विभागाच्या गोडाऊनमधून चोरला लाखोंचा माल, पोलिसांनी अशा आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 11:35 AM

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 28 ऑक्टोबर 2023 : नागपूर शहरात चोरी, लूटमार अशा अनेक गुन्ह्यांच्या घटना वाढल्या असून त्यामुळे सामान्य नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी फारसा फायदा होताना दिसत नाहीये. मात्र चोरट्यांच्या (theft news) या कारनाम्याचा मनपा अधिकाऱ्यालादेखील फटका बसल्याचे दिसले आहे.

शहरातील महानगरपालिकेच्या वीज विभागाच्या गोदामातून लाखो रुपयांचा माल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामुळे एकच खळबळ माजली. चोरट्यांनी त्या गोदामातील पथदिव्यांच्या फिटिंगचे व विजेचे इतर साहित्य लंपास केले. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.

भरबाजारातील गोडाऊनमधून माल गायब झाला, पण कोणालाच कळलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील नवघरे हे महानगरपालिकेमध्ये काम करतात. गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतकॉटन मार्केट येथे मनपाच्या वीज विभागाचे गोदाम आहे. तेथे पथदिव्यांच्या फिटिंगच आणि वीजेच इतर लाखो रुपयांचा साहित्य त्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी नवघरे यांना गोडाऊनमध्ये काही गडबड असल्याचा संशय आला. नीट तपासणी केल्यावर गोडाऊनमधील साहित्याचे काही बॉक्स उघडे पडल्याचे त्यांना आढळलं. त्यातील बरचंस सामाना गायब झालं होतं.

हे लक्षात येताच नवघरे हादरले आणि त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगत चोरीची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत या चोरीच्या प्रकरणाचा शोध सुरू केला. काही चोरट्यांनी त्या गोडाऊनच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला आणि फिटिंग तसेच वीजे साहित्य उपकरणांचा सुमारे 7.65 लाखांचा माल चोरल्याचे त्यातून समोर आले. चोरी करताना ते चोरटे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाले होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गोदाम भरबाजारात आहे. मात्र तरीही त्या गोदामातून माल गायब झाल्याचे इतके दिवस कोणाच्याच लक्षात आले नाही, कोणालाही त्याची कल्पना नव्हती. गोदाम उघडल्यानंतर तेथील बॉक्सेस उघडे पाहून तपास केल्यानंतर त्यातील माल गायब झाल्याचे, चोरी झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

Non Stop LIVE Update
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.