Nagpur Crime : दुकान मालकाशी पैशांवरून वाजलं, कारागिराने थेट दागिन्यांवरच हात केला साफ; 15 लाखांचा माल घेऊन फरार

दुकान मालक आणि कारागीर यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. त्यांचं चांगलच वाजलं होतं. त्यानंतर नोकराने ही चोरी केल्याचे समोर आले. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली होती.

Nagpur Crime : दुकान मालकाशी पैशांवरून वाजलं, कारागिराने थेट दागिन्यांवरच हात केला साफ; 15 लाखांचा माल घेऊन फरार
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 2:42 PM

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,नागपूर | 17 ऑक्टोबर 2023 :  नागपूर शहर (nagpur city) सध्या गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे चर्चेत आलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे नागरिक धास्तावलेले असतात. पोलिसांनी कठोर कारवाई करून देखील काही गुन्हेगार मोकाट फिरताना दिसतात. अशाच एका गुन्ह्याची घटना शहरात उघडकीस आली असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

नागपूर शहरातील एका सोने दुरूस्तीच्या दुकानात मोठी चोरी झाली आहे. या दुकानातील एक कारागीर 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खबळब माजली. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला रेल्वे स्टेशनवरून अटक केले. आणि 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही त्याच्याकडून हस्तगत केले.

पैशांवरून झालेल्या वादामुळे केली चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील इतवारी परिसरात दागिन्यांच्या दुरूस्तीचं दुकान आहे. मोठ-मोठ्या दागिन्यांच्या शोरूममधील दागिने मोठ्या प्रमाणात दुरूस्तीसाठी येत असतात. मात्र या दुकानात काम करणारा एक कारगीर दुकानात दुरूस्तीसाठी आलेले सगळे दागिने घेऊन अचानक फरार झाला. त्याची एकूण किंमत 15 लाख रुपये होती.

दुकानाचा मालक आणि त्याच्यामध्ये पैशांवरून वाद झाला होता. दुकानमालकाने त्याचे पैसे थकवले होते, राहिलेले पैसे तो परत देत नसल्याने कारागीराने सर्व दागिने घेतले आणि तो पसार झाला. त्यानंतर दुकानमालकाने पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. त्याचे फोटो सर्वत्र पाठवले. दरम्यान हा आरोपी रेल्वेने पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडे आरोपीचे पाठवत त्यांना सतर्क केलं. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपीला ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच अटक केली. तसेच त्याने चोरलेले, १५ लाख रुपये किमतीचे सर्व दागिनेही हस्तगत केले. त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येत आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.