Nagpur Drugs Seized : नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्त, गुन्हे शाखेकडून तीन आरोपी अटक

एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी नागपुरात होत असल्याने नागपूर आता ड्रग्ज माफियाचं केंद्र बनत आहे का असे प्रश्न निर्माण होत आहेत.

Nagpur Drugs Seized : नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्त, गुन्हे शाखेकडून तीन आरोपी अटक
नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्त
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 4:24 PM

नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण (Crime Branch) शाखा पथकाने 250 ग्रॅम एमडी ड्रग्स (Drugs) जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. महत्वाचे म्हणजे आज पर्यंतच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स नागपुरातून जप्त करण्यात आलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. इब्राहिम खान अकबर खान,फारुख शेख महमूद आणि वहिदा खान रिझवान खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने अटक केलेल्या इब्राहीम खान अकबर खानवर अगोदरच तडीपारीची कारवाई करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी नागपुरात होत असल्याने नागपूर आता ड्रग्ज माफियाचं केंद्र बनत आहे का असे प्रश्न निर्माण होत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची कारवाई

नागपुरात एमडी ड्रग्स पावडरची तस्करी केली जाणार आहे, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. गुन्हे शाखेचे एक पथक खापरी परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर तैनात करण्यात आले होते. खबऱ्याने माहिती दिलेले आरोपी तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीचे उत्तरं देत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या कारची झडती घेतील असता त्यामध्ये 250 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. (250 grams of drugs seized in Nagpur, three accused arrested by Crime Branch)