Amravati Rape : वेडसर महिलेवर सामूहिक अत्याचार! महिलेचं अपहरण करत आळीपाळीने संतापजनक कृत्य, अमरावतीत खळबळ

Amravati Gang rape : आळीपाळीने या दोघांनी वेडसर महिलेवर 12 ऑगस्ट रोजी दुपारी जंगलात बलात्कार केला.

Amravati Rape : वेडसर महिलेवर सामूहिक अत्याचार! महिलेचं अपहरण करत आळीपाळीने संतापजनक कृत्य, अमरावतीत खळबळ
Pune : तीक्ष्ण हत्याराने वार करून पुण्यात महिलेची हत्या, कारण अस्पष्ट
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Aug 15, 2022 | 1:39 PM

अमरावती : एका वेडसर महिलेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार (Amravati Gang Rape News) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. याप्रकरणी पोलिसांत पीडित महिलेच्या आईने तक्रार दिली असून एकूण दोघा आरोपींना पोलिसांनी अटक (Amravati Crime) केली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. लिफ्ट मागितलेल्या या महिलेला गाडीत बसवून पळवून नेण्यात आलं आणि त्यानंतर आळीपाळीने या महिलेवर अत्याचार (Gang rape Update) करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता घडली. पीडित महिलेच्या आईने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गंभीर दखल घेत एकूण दोघा आरोपींना अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ माजलीय. सेमाडोह इथं ही महिला मुख्य चौकात उभी होती. पीडित महिला वेडसर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या वेडसर महिलेला सुनील मनोहर दहीकर आणि सुखराम नानकराम धांडे यांनी आपल्या बाईकवर बसवलं आणि तिला जंगलात घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

आळीपाळीने या दोघांनी वेडसर महिलेवर 12 ऑगस्ट रोजी दुपारी जंगलात बलात्कार केला. पिली गावाजवळ असलेल्या जंगलात नराधमांनी हे संतापजनक कृत्य केलं असल्याचं समोर आलंय.पीडित महिला ही 20 वर्षांची तरुणी असून या वेडसर महिलेचे लग्नही झाले होते. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीचं पटत नसल्यानं तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडलं होतं. धामी तालुक्यात या पीडितेला लग्न करुन सासरी पाठवण्यात आलं होतं. पण लग्नानंतर झालेल्या वादामुळे पतीने या पीडितेला तिच्या काकाकडे आणून सोडलं होतं. शुक्रवारी रात्री सेमाडोह येथील चौकात ही महिला उभी असताना दोघा नराधमांनी येऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.

हे सुद्धा वाचा

सामूहिक बलात्कार झालेल्या या जखमी महिलेवर सध्या खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरु आहेत. तर चिखलदार पोलिसांत देण्यात आलेल्या फिर्यादीवर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसंच संशयित आरोपी असलेल्या सुनी आणि सुखराम या दोघांना अटकही केली आहे. सध्या या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे चिखलदरा परिसर हादरुन गेला असून संपूर्ण अमरावतीत खळबळ माजलीय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें