चोरट्यांनी चक्क खासदारांचा बंगलाच फोडला, चंद्रपुरात बाळू धानोकरांच्या घरात चोरीचा प्रयत्न

Chandrapur Crime : धानोरकरांच्या सूर्यकिरण नावाच्या बंगल्यावर चोरांना मुख्य दरवाजाला लावलेलं कुलूप फोडलं आणि चोरीचा प्रयत्न करण्यासाठी बंगल्याच्या आत चोर घुसले. 

चोरट्यांनी चक्क खासदारांचा बंगलाच फोडला, चंद्रपुरात बाळू धानोकरांच्या घरात चोरीचा प्रयत्न
बाळू धानोकरांचं घर फोडलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 6:54 AM

चंद्रपूर : चक्क खासदारांच्या (Member of Parliament) घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना चंद्रपुरात (Chandrapur Crime) उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटकही (Three People Arrested) केली. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी खासदारांच्या बंगल्याला असलेलं मुख्य कुलूप तोडून घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्यानं त्यांना निराश होऊन परतावं लागलं. दरम्यान, काहीही न मिळाल्यानं निराश झालेल्या चोरांनी बंगल्याच्या आत नासधूस केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेमुळे पोलिसांचा चोरट्यांना धाक उरलाय का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण जर खासदारांच्या घरावर चोरी करण्याची हिंमत चोरटे करत असतील, तर सर्वसामान्यांचं काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

काँग्रेस खासदाराचं घर फोडलं..

चंद्रपुरात काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी धानोकरांच्या घराची रेकी केली होती. घरात कुणी नाही, हे पाहून चोरी करण्याच्या उद्देशानं त्यांनी डाव साधला. धानोरकरांच्या सूर्यकिरण नावाच्या बंगल्यावर चोरांना मुख्य दरवाजाला लावलेलं कुलूप फोडलं आणि चोरीचा प्रयत्न करण्यासाठी बंगल्याच्या आत चोर घुसले.

सूर्यकिरण बंगल्यातच आधी धानोरकर यांचं कार्यालयही होतं. मात्र आता हे कार्यालय त्यांनी दुसरीकडे शिफ्ट केलेलं. पण राहण्यासाठी म्हणून बाळू धानोरकर हाच बंगला वापर होते. पण ते मुक्कामी नसल्याचं पाहून चोरांनी डाव साधला होता. त्याआधी त्यांनी रेकीही केली होती.

अट्टर चोर अटकेत..

काँग्रेस खासदाराच्या घरात झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी तातडीनं यंत्रणा कामाला लावली. या चोरीप्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांनी आणखी 2 घरफोड्या केल्याचंही आता समोर आलं आहे. शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. बंगल्यातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये चोरटे कैद झाले होते. चोवीस तासांच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुदैवानं हा चोरीचा प्रयत्न फसल्यानं खासदारांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मात्र बंगल्यातील सामानाची नासधून चोरांनी केली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.