हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या मुलीची नागपूरमध्ये सुटका

बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय केला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला मिळाली होती.

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या मुलीची नागपूरमध्ये सुटका
नागपूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Dec 15, 2022 | 2:46 PM

नागपूर : नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवलं आहे. स्वतः व्यवसाय करत असलेली आणि दलाल महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईत मुंबईहून आलेल्या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. सेक्स रॅकेटमध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलीस या सर्वांचा शोध घेत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय केला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला.

दलाल महिलेला पोलिसांकडून अटक

यावेळी देह व्यापारासाठी मुलीला घेऊन जात असलेल्या दलाल महिलेला अटक केली. तर त्या हॉटेलमध्ये आधीच जाऊन असलेल्या ग्राहकाला सुद्धा अटक करण्यात यश आलं. दलाल महिला ही नागपूरच्या वेगवेगळ्या भागात मुली पुरवण्याचं काम करत असल्याचं उघड झालं आहे.

मुंबईहून आलेल्या मुलीची सुटका

तसेच या महिलेसह अनेक दलाल या कामात सक्रिय असल्याचंही पुढे आलं असून पोलीस आता त्यांची पाळमूळं शोधत आहेत. या प्रकरणात देह व्यापारासाठी मुलीला मुंबईतून बोलवण्यात आलं होतं. ही मुलगी गेल्या आठ दिवसापासून नागपुरात आहे, तिची पोलिसांनी सुटका केली.

देह व्यापाराचा व्यवसाय हा शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. पोलिसांनी कारवाया सुरू केल्या असल्या तरी दलाल मात्र सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.