31 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या, गुरांच्या गोठ्यातच आयु्ष्याची अखेर, पत्नी-चिमुरडीचे छत्र हरपले

| Updated on: Feb 14, 2022 | 9:40 AM

पगमेश्वर रामदास पाल (वय 31 वर्ष, रा. नेरला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नेरला येथील रहिवासी होता.

31 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या, गुरांच्या गोठ्यातच आयु्ष्याची अखेर, पत्नी-चिमुरडीचे छत्र हरपले
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

भंडारा : विवाहित तरुणाने आत्महत्या धक्कादायक घटना (Youth Suicide) उघडकीस आली आहे. घरी असलेल्या गुरांच्या गोठ्यात युवकाने गळफास घेतला. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील (Bhandara Crime) नेरला गावात हा प्रकार घडला. पगमेश्वर रामदास पाल असं मयत तरुणाचं नाव आहे. वयाच्या अवघ्या 31 वर्षी त्याने आयुष्याची अखेर केली. मात्र त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पगमेश्वर हा नेरला येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांपासून डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. त्याला काही काळापासून मद्य प्राशनाची सवय जडली होती. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

काय आहे प्रकरण?

पगमेश्वर रामदास पाल (वय 31 वर्ष, रा. नेरला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नेरला येथील रहिवासी होता. पगमेश्वर हा नेरला येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांपासून डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. त्याला दारु पिण्याचं व्यसन काही दिवसांपासून जडलं होतं.

पगमेश्वरने घरात असलेल्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेतला. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धावाधाव केली आणि गळफास घेतलेल्या अवस्थेतील पगमेश्वरचा मृतदेह खाली उतरवला.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मयत पगमेश्वरला पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

पती निधनानंतर आर्थिक चणचण, कर्करोगाने त्रस्त महिलेने जीवनयात्रा संपवली

नागपूरची ती, गोंदियाचा तो, आधी आईला कळवलं, मग विशीतील प्रेमी युगुलाची हॉटेलात आत्महत्या

कर्जबाजारी झाल्यानं नवरा-बायको दोघांनीही विष घेतलं!, उपचारादरम्यान नवरा दगावला, पण पत्नी वाचली