नागपूरची ती, गोंदियाचा तो, आधी आईला कळवलं, मग विशीतील प्रेमी युगुलाची हॉटेलात आत्महत्या

गोंदिया शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कुठल्या कारणामुळे उचललं, याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलिस घेत आहेत.

नागपूरची ती, गोंदियाचा तो, आधी आईला कळवलं, मग विशीतील प्रेमी युगुलाची हॉटेलात आत्महत्या
गोंदियात प्रेमी युगुलाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 7:09 AM

गोंदिया : प्रेमी युगुलाने आत्महत्या (Couple Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये (Gondia Crime News) हा प्रकार घडला. मयत 21 वर्षीय तरुणी नागपूरची रहिवासी होती, तर आत्महत्या करणारा 22 वर्षांचा तरुण हा गोंदियाचाच होता. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तरुणाने आपण संबंधित हॉटेलमध्ये असल्याची माहिती आईला दिली होती. त्यासरशी आईने हॉटेलमध्ये धाव घेतली. वेटरच्या मदतीने तिने रुममध्ये जाऊन पाहिले असते प्रेमी युगुल बेशुद्धावस्थेत होते. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. प्रेमी युगुलाने आपल्या आयुष्याची अखेर का केली, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?

गोंदिया शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कुठल्या कारणामुळे उचललं, याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलिस घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

नागपुरातील 21 वर्षीय रोहिणी पवार आणि गोंदियातिल 22 वर्षीय आकाश छेतीया यांनी आत्महत्या केली. तरुणाने आपण हॉटेल एव्हरग्रीन मध्ये असल्याची माहिती आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला दिली होती. त्यामुळे त्याच्या आईने हॉटेल गाठत वेटरच्या मदतीने रुममध्ये जाऊन पाहिलं. त्यावेळी आकाश आणि रोहिणी हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

गोंदियातील हॉटेल व्यावसायिक आपला स्वार्थ साधण्यासाठी तरुण-तरुणींना खोली भाड्याने उपलब्ध करुन देत असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर देखील गोंदिया पोलिस हॉटेल व्यावसायिकांवर काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे असेल.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं

एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.