एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत

औरंगाबादेतील प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या सुमारास दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत
प्रातिनिधिक छायाचित्र


औरंगाबाद : प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे ही घटना घडली. प्रेयसीच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन दोघांनी आपलं आयुष्य संपवलं.

काय आहे प्रकरण?

औरंगाबादेतील प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या सुमारास दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते हे आपल्या कर्मचाऱ्यांसह गेले. त्यांनी मृतदेहांचा पंचनामा करुन दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आजिंठा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले आहेत.

नेमकं काय घडलं?

सकाळपासूनच युवती घरात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण तरीही तिचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर शेतात जाऊन पाहणी केली असता युवती आणि युवक बांधावरील एका झाडाला एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

या प्रेमी युगुलाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र गेल्या काही दिवसापासून दोघांचीही मनस्थिती चांगली नसल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून अजिंठा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अजिंठा पोलिसांनी दिली आहे. अजिंठा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून आरोपीला अटक

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, फेसबुक फ्रेण्ड पसार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI