दुकान उघडणाऱ्या ज्वेलर्स मालकाची बॅग पळवली, 75 लाखांचे दागिने-रोख लंपास झाल्याचा दावा

| Updated on: Aug 17, 2021 | 8:26 AM

दुकान उघडत असलेल्या ज्वेलर्स मालकाची दागिने आणि पैसे असलेली बॅग दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केली. यात तब्बल 75 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकड़ून मिळत आहे.

दुकान उघडणाऱ्या ज्वेलर्स मालकाची बॅग पळवली, 75 लाखांचे दागिने-रोख लंपास झाल्याचा दावा
भंडाऱ्यात स्वाती ज्वेलर्सच्या मालकाची लूट
Follow us on

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : दुकान उघडत असताना ज्वेलर्स मालक बेसावध असल्याचं पाहून चोरट्यांनी त्याची बॅग लंपास केली. भंडारा शहरातील पेट्रोल पंप ठाणा परिसरात ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा चोरांनी ज्वेलर्स मालकावर पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. जवळपास 75 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा तक्रारीत करण्यता आला आहे.

दुकान उघडताना बेसावध असल्याची संधी

भंडारा शहरालगत असलेल्या जवाहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ठाणा येथे सोमवारी हा प्रकार घडला. दुकान उघडत असलेल्या ज्वेलर्स मालकाची दागिने आणि पैसे असलेली बॅग दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केली. यात तब्बल 75 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकड़ून मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

विनोद भुजाडे यांच्या मालकीचे स्वाती ज्वेलर्स हे ज्वेलरीचे दुकान आहे. भुजाडे यांनी आपलं दुकान उघडत असताना हातातील रोख रक्कम आणि दागिने असलेली बॅग बाजूला ठेवली होती. ते दुकान उघडण्यात व्यस्त होते. यावेळी होंडा हॉर्नेट बाईकने आलेल्या चोरट्यांनी त्यांचे लक्ष नसल्याचे पाहत बॅग लंपास केली आणि पळ काढला.

चोर नागपूरकडे पळाले

दरम्यान, चोर नागपूरच्या दिशेने पसार झाल्याची प्राथमिक माहिती दुकानदाराने दिली आहे. विनोद भुजाडे यांनी जवाहर नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. त्या बॅगेमध्ये तब्बल 75 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपास

बॉयफ्रेंडच्या मदतीने टिप, नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडेखोरांना मध्य प्रदेशात अटक

आधी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, नंतर चेन स्नॅचिंग, आता एकाचवेळी 11 ठिकाणी चोरी, कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट