AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपास

नागपुरात भर दिवसा सोन्या चांदीच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर दुकानदाराला बंधक बनवून दरोडा टाकण्यात आला. चार आरोपींनी हा दरोडा टाकला असून दुकानदाराला बांधून मारहाण करण्यात आली. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत (Robbery at a jwellery shop in Nagpur during day).

नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपास
Nagpur Jwellery Shop Robbery
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 06, 2021 | 8:07 AM
Share

नागपूर : नागपुरात भर दिवसा सोन्या चांदीच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर दुकानदाराला ओलीस धरुन दरोडा टाकण्यात आला. चार आरोपींनी हा दरोडा टाकला असून दुकानदाराला बांधून मारहाण करण्यात आली. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत (Robbery at a jwellery shop in Nagpur during day).

5 जुलै वेळ दुपारी 2 वाजताच्या दरम्यानची होती. दरोडेखोरांपैकी एक जण ग्राहक बनून दुकानात आला. थोड्या वेळात दुसऱ्याने दुकानात प्रवेश करत दुकांदारावर बंदूक ताणली आणि तिसऱ्याने दुकानात प्रवेश करत शटर बंद केलं. दुकानदाराचे हात पाय बांधून त्याला मारहाण केली. तर इतरांनी दुकानात असलेली चार लाख रुपये कॅश आणि सोन्या चांदीचे दागिने लुटले.

एक जण बाहेर पाळत ठेऊन होता. दुकानदार दुकानात एकटाच असल्याने आणि त्यांनी आधीच त्याला बंधक बनविल्याने तो काहीही करु शकला नाही. भर वस्तीतील अगदी रस्त्यावर असलेलं दुकान दरोडेखोर लुटत होते मात्र बाहेरून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याची भनक सुद्धा लागली नाही. पोलीस आता सीसीटीव्ही आणि इतर बाबींचा आधार घेत आरोपींचा शोध घेत आहेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात दोन बाईक वरुन चार आरोपी आले होते आणि ते हिंदी बोलत होते त्याचप्रमाणे एक जण शनिवारी एका महिलेसह दुकानात खरेदी करायला आला होता तो आरोपीतील एक असावा असा संशय दुकानदाराने व्यक्त केला. यावरुन ही लुटारुंची टोळी असावी असा अंतज सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

Robbery at a jwellery shop in Nagpur during day

संबंधित बातम्या :

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप