AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

एका टिकटॉक स्टारने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर नागपुरात खळबळ उडाली.

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 8:31 PM
Share

नागपूर : एका टिकटॉक स्टारने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर नागपुरात खळबळ उडाली. या टिकटॉक स्टारचे नाव समीर खान असून त्याने या मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. अल्पवयीन मुलीसोबत किरकोळ वाद झाल्यामुळे आरोपीने आपल्या मित्राच्या साथीने या मुलीचे अपहरण केले. तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाणही केली. हा प्रकार 18 जून रोजी घडला. म्हणजेच अपहरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Nagpur Police arrested tiktok star who kidnapped minor girl used abusive words and uploaded video on Instagram)

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी समीर खान याची पीडित अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर ओळख वाढवत समीरने या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मात्र, छोट्याशा कारणामुळे समीर खान आणि अल्पवयीन मुलीमध्ये वाद झाला.

मारहाणीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला

त्यानंतर मनात राग धरत आरोपी समीर खानने त्याच्या मो. शकिन मो. सिद्धीकी या साथीदाराला सोबत घेऊन मुलीचे अपहरण केले. अपहरणावेळी समीरने मुलीला बळजबरीने दुचाकी वाहनावर बसवले. तसेच मारहाण आणि शिवीगाळ केली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ 18 जून 2021 रोजी समीर खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये समीर खान अल्पवयीन मुलीला मारहाण तसेच शिवीगाळ करताना दिसत आहे. दुचाकीवर बसून नागपूरमधील कमाल चौकात ही शिवीगाळ केल्याचे समजते आहे.

मुलीला विश्वासात घेतल्यामुळे तक्रार 

आरोपी समीर खानने अपहरण आणि मारहाणीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच तो व्हायरल झाला. त्यानंतर या गंभीर प्रकाराची दखल घेत पाचपावली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुलीचा शोध घेणे सुरू केले. तसेच मुलीची माहिती मिळाल्यावर तिला विश्वासात घेतले. शेवटी तिच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली. तसेच या घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, सोशल मीडियावर कोणाशीही ओळख करताना तसेच बोलताना सगळी खबरदारी घ्यावी असे आवाहान पोलिसांनी केले आहे. पाचपावली पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले असून ते पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?

नागपुरात 30 दिवसात 19 खून, टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शोचा परिणाम

(Nagpur Police arrested tiktok star who kidnapped minor girl used abusive words and uploaded video on Instagram)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.