काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू

| Updated on: Mar 12, 2022 | 8:51 AM

रस्त्यात अचानक तरुणावर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे तो सैरावैरा पळत सुटला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने वाहत असलेल्या गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली.

काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू
भंडारा जिल्ह्यात तरुणाचा कॅनलमध्ये बुडून मृत्यू
Follow us on

भंडारा : काळ तुमची वाट पाहत असेल, तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, असं म्हटलं जातं. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी शहरात याची प्रचिती पाहायला मिळाली. चारचाकी वाहनाने शेतावर जात असताना अचानक तरुणावर मधमाशांनी हल्ला (Honey bee attack) केला. या घटनेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुणाने कॅनॉलमध्ये (Canal) उडी घेतली, मात्र पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश रघु रेवतकर असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तो 25 वर्षांचा होता. शनिवारी वार्ड परिसरात तो राहत होता.

नेमकं काय घडलं?

महेश रेवतकर घरुन शेतावर जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात अचानक त्याच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे तो सैरावैरा पळत सुटला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने वाहत असलेल्या गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली.

पाण्याच्या प्रवाहामुळे बाहेर पडण्यात अयशस्वी

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला कॅनलच्या बाहेर निघता आले नाही. अखेर पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडल्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.

ही घटना वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी महेशचा मृतदेह पवनी येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

या घटनेचा पुढील तपास पवनी पोलिस करत आहेत. मात्र या घटनेमुळे रेवतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे पवनी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

भंडाऱ्यातील जवानाचा कुपवाडा येथे वाहन अपघातात मृत्यू! जम्मू काश्मीरमध्ये होता कार्यरत

CCTV | भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा करुण अंत

तलावाच्या काठावर कपडे दिसले अन् काळजाचा ठोका चुकला, दौंडमध्ये तीन तरुण मित्रांचा करुण अंत