दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, सांगाड्यावरील कपड्यांवरुन पती-मुलीने ओळखलं

| Updated on: Oct 20, 2021 | 1:18 PM

महिलेच्या पती आणि मुलीने कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सुंदरखेड येथील मनिषा मुरलीधर इंगळे या महिलेचा असल्याचे समोर आले आहे. मनिषा इंगळे या 26 ऑगस्ट रोजी भादोला येथून बेपत्ता झाल्या होत्या.

दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, सांगाड्यावरील कपड्यांवरुन पती-मुलीने ओळखलं
बुलडाण्यात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
Follow us on

बुलडाणा : दोन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. बुलडाणा तालुक्यातील भादोला येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह बुलडाणा- खामगाव रोडवरील पोखरी फाट्याजवळ एका विहिरीत आढळला.

महिलेच्या पती आणि मुलीने कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सुंदरखेड येथील मनिषा मुरलीधर इंगळे या महिलेचा असल्याचे समोर आले आहे. मनिषा इंगळे या 26 ऑगस्ट रोजी भादोला येथून बेपत्ता झाल्या होत्या.

काय आहे प्रकरण?

यासंदर्भात बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल पोखरी फाट्याजवळ शेतात सोयाबीन सोंगणाऱ्या मजुरांना दुर्गंधी येत असलयाने त्यांनी पाहणी केली असता काठोकाठ तुडुंब भरलेल्या विहिरीत कुजलेला मृतदेह आढळला.

मृतदेहाच्या हाडांचा सांगाडा

घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी नागरिकांनी विहिरी जवळ एकच गर्दी केली होती. मात्र केवळ मृतदेहाच्या हाडांचा सांगाडाच उरला होता. त्यामुळे मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुण्यात पतीने पत्नीला विहिरीत ढकललं

दुसरीकडे, उच्चशिक्षित कुटुंबातील पती-पत्नींमध्ये शिक्षणावरुन वाद झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे विद्येचं माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या पुण्यातच हा प्रकार घडला आहे. पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या रागातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात उच्चशिक्षित कुटुंबात हा प्रकार घडला. पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. याच रागातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेला विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

इस्त्रीवरुन वाद झाल्याचं सांगण्याची धमकी

विशेष म्हणजे इस्त्रीच्या कारणावरुन वाद झाल्याचे सांगण्याची धमकी पतीने पत्नीला दिल्याचा दावा केला जात आहे. वनिता राठोड असे 24 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे, तर अनिल राठोड असे पतीचे नाव आहे. मंचर पोलिस स्टेशनमध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

CCTV | एक्स बॉयफ्रेण्डचा तरुणीवर भररस्त्यात चाकू हल्ला, सीसीटीव्ही हादरवणारी दृश्यं कैद

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, शॉर्ट फिल्म मेकरवर गुन्हा

पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबात वाद, शिक्षणासाठी पैसे मागितल्याने बायकोला विहिरीत ढकललं