मामा भाचाच्या डोहाने एकाच आठवड्यात घेतला दुसरा बळी, अनोळखी मृतदेह आढळला

बुलडाणा - अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि वारी हनुमान येथील परिचित असलेल्या मामा भाच्याच्या डोहाने एकाच आठवड्यात दुसरा बळी घेतला. खरं तर या मामा भाच्याच्या डोहाने आजपर्यंत शेकडो बळी घेतले आहेत

मामा भाचाच्या डोहाने एकाच आठवड्यात घेतला दुसरा बळी, अनोळखी मृतदेह आढळला
मामा भाचाचा डोह
Image Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 8:45 AM

बुलडाणा : मामा भाचाच्या डोहाने पुन्हा एक बळी (Death) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोहात अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाच आठवड्यात दुसरी घटना घडल्याचं समोर आलं आहे. डोह बुजवण्याबाबत यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बुलडाण्यात (Buldana) घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तरुणाचा अपघाती मृत्यू झाला, त्याने आत्महत्या केली, की त्याच्यासोबत घातपात घडला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

काय आहे प्रकरण?

बुलडाणा – अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि वारी हनुमान येथील परिचित असलेल्या मामा भाच्याच्या डोहाने एकाच आठवड्यात दुसरा बळी घेतला. खरं तर या मामा भाच्याच्या डोहाने आजपर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. त्यामुळे डोहाला संरक्षण कंपाउंड व्हावे ही मागणी वारंवार केली जात आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. त्यामुळे अजून किती जीव घेण्याची वाट प्रशासन पाहते आहे, असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय.

नेमकं काय घडलं?

काल 7 मे रोजी या डोहात एक अनोळखी मृतदेह तरंगताना दिसले, मृतकाने लाल रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत, वारीचे सरपंच शिवाजी पतींगे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला आणि प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठवले आहे. तर मृतकाची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.

एकाच आठवड्यात दुसरा बळी

तीन दिवसांपूर्वी याच डोहामध्ये अकोला येथील राजेश गुडदे या तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षात सामाजिक कार्यकर्त्यांनी हा डोह बुजवण्यात यावा, अन्यथा त्याला संरक्षण देऊन तिथे कुणी जाऊ नये ही मागणी लावून त्याचा पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मामा भाचाचा डोह अजून किती बळी घेणार ? असा प्रश्न पडतोय.