Nagpur Murder | रिलेशनशीपनंतर लग्नाला नकार, प्रियकराने मॉलमध्ये भेटायला बोलवून प्रेयसीचा गळा आवळला

नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एम्प्रेस मॉलमध्ये एका तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रियकरानेच तिची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे

Nagpur Murder | रिलेशनशीपनंतर लग्नाला नकार, प्रियकराने मॉलमध्ये भेटायला बोलवून प्रेयसीचा गळा आवळला
नागपुरात तरुणीची हत्या
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 9:02 AM

नागपूर : प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मॉलमध्ये बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तरुणीचा मृतदेह सापडला होता. प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने तिची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एम्प्रेस मॉलमध्ये एका तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावर बांधकाम सुरु आहे. त्या जागेवर संबंधित तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

वीस वर्षीय तरुणीची हत्या

फरजाना कुरेशी असं 20 वर्षीय मयत तरुणीचं नाव आहे. ती नागपुरातील गिट्टीखदान येथील रहिवासी होती. तर 22 वर्षीय आरोपी मुजाहिद अन्सारी तिचा प्रियकर होता. तो मोमीनपूरा भागात राहत होता.

आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार फरजानाच्या आईने 2 डिसेंबरला पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत तरुणीचा शोध सुरु केला होता.

लग्नाला तरुणीचा नकार

आरोपी मुजाहिदचे फरजाना हिच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेम संबंध होते. मात्र तिने मुजाहिदसोबत लग्न करण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. याच रागातून मुजाहिदने प्रेयसीची हत्या केली आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावर बांधकाम सुरु असलेल्या जागी भेटायला बोलावून मुजाहिदने फरहानाची ओढणीने गळा आवळून हत्या केली. गणेशपेठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

लग्नाला आला, जेवणावर ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?

मेरी बहन को मारा म्हणत चाकूनेच भोसकलं, औरंगाबादमधील कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर गंभीर जखमी!