AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेरी बहन को मारा म्हणत चाकूनेच भोसकलं, औरंगाबादमधील कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर गंभीर जखमी!

अचानक चाकू हल्ला झाल्यामुळे या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी झाले. हल्लेखोर घरातून पळून जात असताना परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. तेव्हा त्याने इसने मेरी बहन को मारा म्हणत हाताला झटका देत पळ काढला.

मेरी बहन को मारा म्हणत चाकूनेच भोसकलं, औरंगाबादमधील कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर गंभीर जखमी!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 6:31 PM
Share

औरंगाबादः शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरच्या घरात घुसून त्यांच्यावर एकाने प्राणघातक (knife attack) हल्ला केला. यात सदर डॉक्टर गंभीर जखमी झाले. कॅनॉट प्लेस परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. डॉक्टरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत डॉ. राफे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोट दुखत असल्याचा बहाणा करून आत घुसला

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्करोग रुग्णालय येथे कार्यरत असलेले डॉक्टर अब्दुल राफे हे कॅनॉट भागातील अपार्टमेंटमध्ये राहतात. ते नेहमीप्रमाणे कामावरून घरी आले. काही वेळाने त्यांच्या घरी एक व्यक्ती पोट दुखण्याच्या बहाण्याने आली. डॉक्टरांकडून चिठ्ठीवर गोळ्यांची नावे लिहून घेतली. त्या गोळ्या-औषधी दाखवण्यासाठी आत आला. डॉक्टर गोळ्या कशा पद्धतीने घ्यायच्या हे सांगत असतानाच डॉक्टर अब्दुल राफे यांच्या पोटात चाकू खुपसला.

मेरी बहन को मारा म्हणत पळून गेला

अचानक चाकू हल्ला झाल्यामुळे या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी झाले. हल्लेखोर घरातून पळून जात असताना परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. तेव्हा त्याने इसने मेरी बहन को मारा म्हणत हाताला झटका देत पळ काढला. सदर आरोपीची दुचाकी अपार्टमेंटच्या खालीच राहिली. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत डॉ. राफे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुचाकी कर्नाटकातील गुलबर्गा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

इतर बातम्या

VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता

अनिल परबांच्या अडचणी वाढल्या, दापोलीतील रिसॉर्टच्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द!

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.