रत्नागिरी : दापोलीतील रिसॉर्ट (Dapoli Resort) प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना (Non-agricultural license) रद्द करण्यात आला आहे. हा परवाना फरवणुकीने घेण्यात आला होता त्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बिगरशेती परवाना रद्द केल्याचं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने लोकायुक्तांकडे सादर केलं आहे. राज्य सरकारनं अशाप्रकारचं पत्र सादर केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणात सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.