मित्रासोबत पत्नीच्या गप्पा खटकल्या, नवऱ्याने थेट उकळतं तेल चेहऱ्यावर फेकलं

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या जोडप्यामध्ये वाद सुरु होते. पती पत्नीच्या चारित्र्यवर सातत्याने संशय घेत होता. रविवारी मात्र हद्द झाली. झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने थेट उकळते तेल टाकले

मित्रासोबत पत्नीच्या गप्पा खटकल्या, नवऱ्याने थेट उकळतं तेल चेहऱ्यावर फेकलं
Nagpur Pachpavali Police Station
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 9:00 AM

नागपूर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या अंगावर उकळते तेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तर पत्नी 35 टक्के भाजली गेली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या जोडप्यामध्ये वाद सुरु होते. पती पत्नीच्या चारित्र्यवर सातत्याने संशय घेत होता. रविवारी मात्र हद्द झाली. झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने थेट उकळते तेल टाकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर नागपूरच्या मेओ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ती 35 टक्के भाजल्याची माहिती आहे.

पत्नीच्या मित्रासोबत गप्पा

आरोपी पती सतीश भिमटे हा पेंटिंगचे काम करतो. मात्र मागील चार महिन्यांपासून तो बेरोजगार आहे. घरी पत्नी भावना आणि दोन मुलं आहेत. भावना मोबाईलमध्ये व्यस्त असायची. रात्री ती आपल्या मित्रासोबत मोबाईलवर गप्पा मारत राहायची. त्यावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. सतीश तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

घटनेच्या दिवशी भावना झोपली होती, त्याचवेळी सतीशने तेल गरम केले आणि उकळलेले तेल तिच्या चेहऱ्यावर टाकले. महिलेचा चेहरा भाजल्याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत.

संशय हा माणसाला कुठल्या थराला पोहोचवेल, याचा नेम नाही. पती पत्नीच्या नात्यात सुद्धा या संशयाने घर केलं आणि नात्यांची राखरांगोळी झाली.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नाहीत, नैराश्यातून पतीची गळफास घेत आत्महत्या

घरात शिरुन तरुणीवर हल्ला, नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय मुलीची हत्या, आरोपी नराधमाने असं का केलं?

चोरटा बेकरीत आला, चॉकलेट मागू लागला, संधी मिळताच महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं, शेतातून पळून जात असताना पोलिसांनी घेरलं