AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलढाण्यात महिलेवर आठजणांचा सामूहिक बलात्कार; महाराष्ट्र हादरला

महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तात्काळ आरोपींना अटक करणार असल्याच पोलिसांनी म्हटल आहे.

बुलढाण्यात महिलेवर आठजणांचा सामूहिक बलात्कार; महाराष्ट्र हादरला
buldhana policeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 14, 2023 | 8:28 AM
Share

बुलढाणा, दिनांक 14 जुलै 2023 : बुलढाणा येथील राजूर घाटात धक्कादायक घटना घडली आहे. एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. आठ जणांनी आळीपाळीने या महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिच्याकडील 45 हजार रुपयेही लुटून आरोपी फरार झाले आहेत. पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी या त्यांच्या गावी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी गावी जात होते. त्यावेळी राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी आठजणांचं टोळकं आलं. त्यांनी या दोघांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर या महिलेला दरीत ओढत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन तास ठिय्या आंदोलन

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

असा घडला गुन्हा

बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजुर घाटात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणे एक महिला आणि तिचा नातेवाईक मित्र देवीच्या मंदिर परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या आठ जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून घेतली.

त्याच्यासमोर सदर महिलेलाही चाकूचा धाक दाखवून तिच्यावर आठ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. तशी तक्रार या तरुणाने बोराखेडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान बोराखेडी पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी, बुलढाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर उपस्थित होते.

तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी तब्बल तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर हे आरोपी फरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले. मोहेगावच्या लोकांनी त्यातील एक आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे.

यापूर्वी देखील याच राजुर घाटात बरेचदा बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. मात्र बदनामी पोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एका बलात्काराच्या घटनेत पोलिसांना फोन केल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.