AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनीता जामगडे पाकिस्तानातील तिघांच्या संपर्कात, कोण आहेत ते तिघे?

Sunita Jamgade News: नागपूर येथील सुनीता जामगडे तेरा वर्षाच्या मुलास सोडून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गेली होती. या महिलेला हेरगिरीच्या संशयावरुन पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सुनीता जामगडे पाकिस्तानातील तिघांच्या संपर्कात, कोण आहेत ते तिघे?
सुनीता जामगडे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 02, 2025 | 8:52 AM
Share

महाराष्ट्रातील नागपूर येथील सुनीता जामगाडे (वय 43) या महिलेला हेरगिरीच्या संशयावरुन पोलिसांनी अटक केली आहे. भारताची सीमा ओलांडून ती पाकिस्तानात गेली होती. सुनीता जामगडे पाकिस्तानातील तीन नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता तिघांच्या संपर्कात होती. नागपूर पोलिसांकडून तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटची सखोल तपासणी केली जात आहे.

सुनीता इंन्स्टाग्रामवरून पाकिस्तानमधील तिघांच्या संपर्कात होती. इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानमधील झुल्फेकर, असद आणि तौफिक या तिघांच्या सतत संपर्कात ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांना भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचे तपासातून समोर आले आहे. हे तिघे पाकिस्तानी नागरिक आहेत की गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट? त्याचा तपास आता केला जात आहे. नागपूर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी सुनीताचा इंन्स्टाग्राम, फेसबुक अकाउंटची तपासणी सुरु केली आहे.

नागपूर पोलिसांनी शासकीय गुप्त अधिनियमांसह विविध कलमान्वये सुनीतावर गुन्हा दाखल केला आहे. तिला गुरुवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आज तिला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे. पोलीस तपासात सुनीता वारंवार आपला जबाब बदलत आहे. नोकरी शोधण्यासाठी पीओकेमध्ये गेल्याचे तिने म्हटले होते. पाकिस्तानमधील रुग्णालयात तिला नोकरी करायची होती. सुनीताचा मोबाईल फोन जप्त केला आहे. परंतु हा फोन फॉर्मेट केल्याचे स्पष्ट झाले आहे. फोरॉन्सिक टीम डिलिट केलेला डाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मुलास सोडून पाकिस्तानात

सुनीता जामगडे ४ मे रोजी तिच्या १३ वर्षीय मुलासोबत नागपूरवरुन निघाली होती. १४ मे रोजी नियंत्रण रेषेवर असलेले शेवटचे गाव हुंडरमान येथे ती गेली. तिने तिच्या मुलास हॉटेलमध्ये सोडून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. नऊ दिवस तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर २३ मे रोजी पाकिस्तानी रेंजर्सने तिला भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?