दोन्ही चांगले मित्र पण तो श्रीमंती दाखवयाचा… मग मित्रानेच केली हत्या
नागपूर शहरातील उच्चभ्रू भागात गोळीबारचा थरार झाला आहे. सोमवारी रात्री मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना रेस्टॉरंट मालकावर हल्ला झाला आहे. चार हल्लेखोर त्यांच्यावर गोळीबार करुन पसार झाले. या घटनेत 'सोशा रेस्टॉरंट'चे मालक अविनाश भुसारी यांचा मृत्यू झाला.

नागपूरमध्ये खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. त्या दोन्ही मित्रांमध्ये भांडण किंवा इतर कोणतेही कारण नव्हते. फक्त मित्र श्रीमंती दाखवत होता, त्यामुळे त्याचा हेवा वाटत होता. यामुळे मित्रानेच मित्राची हत्या केली. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत एका 19 वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला. वेदांत खंडाडे मृतकाचे नाव असून आरोपीचे नाव मिथिलेश चकोले असे आहे.
वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते. वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती. त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकली होती. त्यानंतर ते हुडकेश्वर या परिसरात राहायला आले. त्यानंतर वेदांत आणि मिथिलेश यांची मैत्री झाली. मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे. दोघांची चांगली मैत्री झाली. 8 एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले. एका पान टपरीवर दोघांनी कोल्ड्रींक घेतले. मात्र आरोपीने नकळतपणे त्याच्या कोल्ड्रींकमध्ये विष टाकले. त्यामुळे काही वेळातच त्याची ताब्यात बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर घरच्यांची विचारपूस केली. त्याच्या मित्राची चौकशी केली. त्यावेळी सगळा वेगळाच प्रकार समोर आला. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खंडणीच्या संदर्भात एक पत्र मिळाल्याचे पण पुढे येत आहे. मात्र पोलीस त्याचा तपास करत आहे.




नागपुरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार
नागपूर शहरातील उच्चभ्रू भागात गोळीबारचा थरार झाला आहे. सोमवारी रात्री मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना रेस्टॉरंट मालकावर हल्ला झाला आहे. चार हल्लेखोर त्यांच्यावर गोळीबार करुन पसार झाले. या घटनेत ‘सोशा रेस्टॉरंट’चे मालक अविनाश भुसारी यांचा मृत्यू झाला. नागपुरात पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळीबार करुन ही हत्या करण्यात आली.
धरमपेठ परिसरातील सोश्या रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी हे रात्री निंबस लॉजसमोर आपल्या मित्रांसोबत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.