AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime | दबक्या पावलांनी आला, पोलिसाच्या घरात शिरला, पिस्तूल आणि 30 गोळ्या घेतल्या आणि…

नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या घरातच आता चोरी व्हायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नागपुरात याआधीदेखील तशी घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा तशीच घटना घडली. या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

Nagpur Crime | दबक्या पावलांनी आला, पोलिसाच्या घरात शिरला, पिस्तूल आणि 30 गोळ्या घेतल्या आणि...
| Updated on: Dec 27, 2023 | 3:44 PM
Share

सुनील ढगे, Tv9 मराठी, नागपूर | 27 डिसेंबर 2023 : पोलीस आपली सुरक्षा करतात. ते सदैव देशासाठी तत्पर असतात. ते खून, दरोडा, चोऱ्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळतात. पोलीस महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांच्या नांग्या ठेचतात. ते गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरतात. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांमुळे धडकी भरते, असं आपण म्हणतो. पण नागपुरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नागपुरात पोलिसाच्या घरातून त्याची पिस्टल आणि 30 गोळ्या चोरील्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे चोरट्याची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडलं. संपूर्ण घरात शोधाशोध केली. कपाटातील पिस्टल आणि तिथे ठेवलेल्या जिवंत 30 काडतुसे घेतले आणि तिथून पसार झाला. आता हे पिस्टल कोणाच्या हाती पडलं असेल? हा मोठा सवाल आहे. नागपुरात आधीच गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असताना, अशाप्रकारे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून पिस्टल आणि जिवंत काडतुसची चोरी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपुरात राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पिस्टल आणि काडतूस पळविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच चोरटे आव्हान देत असल्याचे चित्र आहे.

राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात. लांजेवार हे एस.आर.पी.एफ. गट क्र. 4 च्या समादेशक प्रियंका नारनवरे यांचे गनमॅनपदी कार्यरत आहे. मंगेश लांजेवार हे त्यांचे पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस घरी ठेवून, साप्ताहिक सुटी असल्याने भंडारा येथे गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून आलमारीचे कुलूप तोडले. त्यानंतर चोरट्यांनी आत असलेले पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस चोरून नेले.

मंगेश हे नागपूरला परत आले असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलले, पिस्तूल आणि काडतुसे गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी नागपूर शहरातील एका ठाणेदाराचेही सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरीला गेले आहे. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.