Nagpur Crime : प्रेयसीसमोरच कानाखाली लगावल्याने फिरलं डोकं, त्याला उचलून थेट कारमध्ये टाकलं आणि…

भरधाव वेगाने कार जाताना कट लागला, त्यामुळे तरूणाने त्याला जाब विचारला. त्यानंतर भडकलेल्या इसमाने असं काही केलं ज्यामुळे सहरच हागरलं. पोलीस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत.

Nagpur Crime : प्रेयसीसमोरच कानाखाली लगावल्याने फिरलं डोकं,  त्याला उचलून थेट कारमध्ये टाकलं आणि...
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 4:41 PM

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 18 ऑक्टोबर 2023 : नागपूर शहरात (nagpur crime) गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढच होत चालली आहे. गुंडांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. मात्र त्यांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक जीव मुठीत धरून जगत आहे. पोलिसांच्या वाढत्या बंदोबस्तानंतरही गुंडाना काही रोखता आलेलं नसल्ययाने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशाच एका गुंडाच्या दहशतीमुळे तीन तरूणांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा कट लागल्यावर जाब विचारण त्यांच्या अंगाशी आलं. छोट्याशा मुद्यावरून झालेल्या वादानंतर समोरच्या व्यक्तीने असं काही केलं ज्यामुळे त्यांचं आयुष्यच बदललं. एका गुंडाने त्याच्या साथीदारांसह तिघांचं अपहरण करून त्यांना बेदम चोप दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कमल अनिल नाईक याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सुमीत ठाकूर व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रेयसीसमोरच लगावली कानाखाली

पीडित तरूण कमल अनिल नाईक हा ठवरे कॉलनीत राहतो. घटना घडली त्या रात्री कमल त्याच्या मित्रांसह एका वाढदिवसाला गेला होता. तेथून परत आल्यानंतर ते कमलच्या घराबाहेर गप्पा मारत उभे होते. मात्र तेवढ्यात सुमित ठाकूर व त्याची प्रेयसी हे एका कारमध्ये बसून भरधाव वेगाने जात होते. त्यांच्या कारचा कट कमल याला लागला, पण तो थोडक्यात बचावला. त्यानंतर कमलने आरडाओरडा करत त्यांना थांबवला. आरोपी सुमित आणि कमल यांच्यात वाद सुरू झाला व भांडण चांगलंच पेटलं.

कमल नाईकने त्याला कार हळू चालविण्यास सांगितले. मात्र सुमितने त्याचे नाव सांगेत आपण गुंड असल्याचे सागून रुबाब झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे पाहूनही कमल घाबरला नाही आणि त्याने सुमितच्या प्रेयसीसमोरच्या त्याच्या एक कानाखाली लगावली. आपल्या प्रेयसीसमोरच अपमान झाल्याने सुमित संतापला. तेव्हा तो तिथून निघून गेला. पण थोड्या वेळाने त्याच्या पाच साथीदारांसह पुन्हा कमलच्या घराजवळ आला आणि त्या सर्वांनी कमल आणि त्याच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखलत कारमध्ये कोंबून अपहरण केले. तिथून ते त्यांना हजारी पहाड येथील शबाना बेकरी समोरील मोकळ्या भूखंडावर घेऊन गेले. सुमित व त्याच्या साथीदारांनी कमल सह त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली, चोपही दिला.

घरी कसाबसा परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमलने जरीपटका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा कसून शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या गुंड प्रवृत्तीच्या सुमित ठाकूर विरोधात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.