मौजमजा, चैनीसाठी हवा होता पैसा, थेट घरावर टाकला दरोडा; कुख्यात गँगला कशी केली अटक ?

चैन करण्यासाठी , पैसे मिळवण्यासाठी त्यांनी लूटमारीचा हा उद्योग सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी दोघे कुख्यात गुन्हेगार आहेत. तर या गँगमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

मौजमजा, चैनीसाठी हवा होता पैसा, थेट घरावर टाकला दरोडा; कुख्यात गँगला कशी केली अटक ?
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 3:44 PM

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 27 सप्टेंबर 2023 : पैशांचा मोह वाईट… पैसा कमावण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. प्रसंगी वाट्टेल त्या थरालाही जाऊ शकतो. अशावेळी चांगल्या वाईटाची समज काही कामी येत नाही ना पुढला-मागचा विचार केला जातो. तेव्हा फक्त एकच विचार डोक्यात असतो, तो म्हणजे पैसे कसा मिळवता येईल ? पैशांच्या याच मोहापायी, चैनीसाठी, उधळपट्टीसाठी घरफोडी करून लूटमार (theft case) करणाऱ्या एका टोळीला पकडण्यात पोलिसांना (gang arrested) यश मिळाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीचा माल, दागिने हे देखील जप्त केले आहेत.

नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी ही कारवाई केली असून कुख्यात गँगच्या सदस्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या गॅंग मध्ये पाच आरोपी असून त्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश असल्याचे समजते.

कुठे घडला गुन्हा ?

नागपूरच्या पाचपावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीतील घरात ही लूट झाली. घरात कोणीच नसल्याचे संधी साधून, कुलूप असल्याचे पाहून या गँगने दरोडा टाकण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे त्यांनी तो दरोडा टाकत घरफोडी केली आणि लुटीचा माल घेऊन पळूनही गेले. मात्र तेथील सीसीटीव्ही मध्ये ही चोरीची घटना आणि त्यांचे चेहरे कैद झाले होते.

घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर घरमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून त्या आधारे चोरी करणाऱ्या गँगची ओळख पटली आणि पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यातील दोन आरोपी हे कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तर या गँगमध्ये एका अल्पवयीन आरोपीचासुद्धा समावेश आहे. हे सर्व आरोपी 22 ते 25 वयोगटातील आहेत. चैन करण्यासाठी , पैसे मिळवण्यासाठी त्यांनी लूटमारीचा हा उद्योग सुरू केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह लुटीचा इतरही मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या गँगने यापूर्वी इतर ठिकाणी, आणखी कुठे अशा प्रकारे घरफोडीचे गुन्हे केले याचा शोध पोलीस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.