नागपूरमधील रेडलाईट एरियात पोलिसांची मोठी कारवाई, 8 अल्पवयीन मुलींची सुटका, 100 ग्राहक ताब्यात

मोठा फौजफाटा घेऊन नागपूर पोलिसांनी शहरातील गंगा जमुना नावाने सुरु असलेल्या रेडलाईट एरियावर मोठी कारवाई केली आहे.

नागपूरमधील रेडलाईट एरियात पोलिसांची मोठी कारवाई, 8 अल्पवयीन मुलींची सुटका, 100 ग्राहक ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:59 AM

नागपूर : मोठा फौजफाटा घेऊन नागपूर पोलिसांनी शहरातील गंगा जमुना नावाने सुरु असलेल्या रेडलाईट एरियावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 8 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. या संदर्भात पोलिसांनी 5 गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत 100 च्यावर ग्राहक आणि दलालांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत जवळपास 100 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते (Nagpur Police raid on Ganga Jamuna Red light area in Nagpur).

नागपूरचा गंगा जमुना परिसर रेडलाईट म्हणून कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. या ठिकाणी जबरदस्तीने अवैधरित्या लहान मुलींकडूनही हा व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी मोठं चक्रव्युव्ह रचलं आणि धाड टाकली.

गुन्हे शाखा पोलीस आणि लकडगंज पोलिसांनी या कारवाईचं सुक्ष्म नियोजन केलं. ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकात 100 च्या जवळ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या ठिकाणी एकाच वेळी पोलिसांची धाड पडल्याने चांगलीच तारांबळ उडाली. यात पोलिसांनी 100 पेक्षा जास्त ग्राहक आणि त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे पोलिसांनी 8 अल्पवयीन मुलींचीही या ठिकाणाहून सुटका केली.

या प्रकरणी वेगवेगळ्या कलमांखाली एकूण 5 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) सुनील फुलारी यांनी दिली. पोलिसांनी गुरुवारी (10 डिसेंबर) या संपूर्ण धाडसत्राचं आयोजन केलं होतं. नागपूरमध्ये या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान या आधी सुद्धा या ठिकाणी अशाप्रकारे धाड टाकून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र काही दिवसांमध्ये पुन्हा या ठिकाणी तेच काम सुरु झालं. आता पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर काय फरक पडेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

हेही वाचा :

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

जळगावातील उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची वेश्या व्यवसायातून सुटका

व्हिडीओ पाहा :

Nagpur Police raid on Ganga Jamuna Red light area in Nagpur

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.