मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 3 मुलींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) गोरेगावमध्ये (Goregaon) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापाराचं (Sex Racket) मोठं रॅकेट उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 3 मुलींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये खळबळ उडाली आहे. (sex racket in mumbai 3 arrested including Bollywood actress)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते डिलर्सलासुद्धा भेटले.

‘रोहित पवारांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही धंदा केला’

सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. जीच्यावर मोठ्या हॉटेल्समध्ये देह व्यापारासाठी बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्रींचा आरोप आहे.

बॉलिवूडच्या एका आंतरराष्ट्रीय बेली डान्सर आणि दोन टीव्ही मालिका करणाऱ्या अभिनेत्रींवर या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटसाठी 10 लाखांची डिल केली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकून सेक्ट रॅकेट उधळून लावण्यात आलं आहे.

धक्कादायक! गाडी अडवली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांनी तलवारीने केले वार

(sex racket in mumbai 3 arrested including Bollywood actress)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI