AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती तरुण होती… अर्धांगवायूमुळे नवरा खाटेवरच पडलेला… अन् एक दिवस कांडच… पोस्टमार्टेम रिपोर्ट आला आणि… नागपूरमध्ये पाणी विक्री करणाऱ्या बाईची का होतेय चर्चा?

पती हा अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीने प्रियकराचा मदतीने पतीचा नाक तोंड दाबून आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ती तरुण होती... अर्धांगवायूमुळे नवरा खाटेवरच पडलेला... अन् एक दिवस कांडच... पोस्टमार्टेम रिपोर्ट आला आणि... नागपूरमध्ये पाणी विक्री करणाऱ्या बाईची का होतेय चर्चा?
Wife killed husband
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 07, 2025 | 6:38 PM
Share

पत्नीने पतीचा खून केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच घटना नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पती हा अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीने प्रियकराचा मदतीने पतीचा नाक तोंड दाबून आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे. तर दिशा रामटेके असं पत्नीचं नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिशा रामटेके हिचे मृत चंद्रसेन सोबत तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून तो घरीच होता. दिशा रामटेके ही पती घरात असल्यानं घरखर्च भागविण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती.

व्यवसाय करत असताना काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्याशी ओळख झाली. आसिफ अन्सारी हा दुचाकी दुरुस्ती आणि पंचर दुरुस्तीच काम करत होता. हळू-हळू दोघांमधील प्रेम सबंध वाढले. याचा पतीला संशय आल्याने तो तिला वारंवार शिवीगाळ करत होता.

पतीने शिवीगाळ केल्याचा राग आल्याने त्याचा काटा काढण्याचे दिशा आणि प्रियकर आसिफ अन्सारीने ठरवले. दिशाने नाका तोंडावर उशीने ठेवून आणि गळा आवरून चंद्रसेनचा खून केला. चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निपचित पडलेला दिसला. त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनावं दिशाने केला मात्र नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर असिफ अन्सारीला अटक केली आहे, या दोघांची कसून चौकशी सुरु असताना दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर