पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप, माजी आमदाराच्या पॅरोलवर सुटलेल्या मुलाचा गळफास

| Updated on: Apr 01, 2021 | 9:47 AM

53 वर्षीय सुनील पाचपुते हा पत्नीच्या हत्येप्रकरणी औरंगाबादमधील हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. (Nanded Former MLA's son Suicide )

पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप, माजी आमदाराच्या पॅरोलवर सुटलेल्या मुलाचा गळफास
माजी आमदारच्या मुलाची आत्महत्या
Follow us on

नांदेड : पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या माजी आमदारपुत्राने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुनील पाचपुते याने आत्महत्या केली. नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Nanded Crime Former MLA’s son Sunil Pachpute out on Parole Suicide at Home)

53 वर्षीय सुनील पाचपुते हा पत्नीच्या हत्येप्रकरणी औरंगाबादमधील हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. लॉकडाऊनमुळे तो किनवट तालुक्यातील जलधारा इथे आपल्या गावी आला होता. रात्री उशिरा त्याने राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुनील हा दिवंगत माजी आमदार किशनराव पाचपुते यांचा मोठा मुलगा होता. सुनीलचा धाकटा भाऊ तारकेश्वर पाचपुते याला सर्वप्रथम आत्महत्येची घटना समजली. त्यानंतर त्याने इस्लामपूर पोलिसांना याविषयी माहिती दिली. सुनीलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

धुळ्यात तुफान राडा

नांदेडमध्ये जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता धुळ्यात काही लोकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करुन आरोपींना पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे हा प्रकार घडला.

याठिकाणी बुधवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. एका मुलीची छेड काढल्यावरुन हा वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा आरोपींशी संबंधित असणाऱ्या गटाचे लोक थेट पोलीस ठाण्यावर चाल करुन आले.

संबंधित बातम्या :

VIDEO: धुळ्यात तुफान राडा, आरोपींना सोडवण्यासाठी जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला, गोळीबारात दोघे जखमी

नांदेडमध्ये शीख समुदायाकडून पोलिसांवर हल्ला, 20 जणांना अटक, तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल 

(Nanded Crime Former MLA’s son Sunil Pachpute out on Parole Suicide at Home)