AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Crime : बहिणीची सोयरीक मोडल्याचा बदला म्हणून घेतला जीव ? सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट

नांदेडमध्ये अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकरची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून सोनूच्या प्रेयसीच्या भावाने, सूड घेतल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. गुन्हेगार गोलू मंगनाळे याने तुरुंगातून कट रचून ही हत्या घडवून आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने नांदेड शहर हादरले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Nanded Crime : बहिणीची सोयरीक मोडल्याचा बदला म्हणून घेतला जीव ? सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट
सोनू कल्याणकर खून प्रकरण
| Updated on: Apr 07, 2026 | 9:24 AM
Share

नांदेडमधील अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकरचा झालेल्या खुनाने अख्खं शहर हादरलं असून सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. सोवमारी सकाळी त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 4 जणांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून सोनूचा जीव घेतला. याप्रकरणाने खळबळ माजली, मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी मारेकऱ्यांना अटक केली. पाठलागादरम्यान एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, मात्र त्याला प्रत्युत्र देताना पोलिसांनीही गोलि्या झाडल्या. ज्यात अंकुश गंदमवार हा जखमी झाला. आपसी जुन्या वादातून सोनू कल्याणकरची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे.

अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकरचा खून प्रेम प्रकरणातून झाला, सोनूच्या प्रेयसीच्या भावाने जेल मधून बदला घेतल्याचा आरोप सोनूच्या वडिलांनी केला असून त्यांच्या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात काल सकाळी झालेला खून, हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयरीक मोडल्याने प्रेयसीच्या भावानेच घेतला बदला़

कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंघ संधु उर्फ रिंदा यांच्या गँगमधील सदस्य असलेल्या गुन्हेगार गोलू मंगनाळे हाच सोनू कल्याणकरच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा वडिलांनी केलाय. सोनूच्या वडिलांनी अशोक कल्याणकर यांनी याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानंतर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मयत सोनू कल्याणकर याचे सर्राईत गुन्हेगार गोलू मंगनाळे याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. मात्र 2020 साली सोनू कल्याणकरने गोलूच्या बहिणीची सोयरीक मोडल्याचा आरोप आहे. मुलीचं ठरलेलं लग्न, सोयरीक मोडली म्हणून सोनूच्या विरोधात त्या मुलीच्या वडिलांनी विमानातळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये सोयरीक मोडलेल्या मुलीचा भाऊ गोलू मंगनाळे आणि त्याच्या साथीदारांनी सोनू कल्याणकर याच्यावर गोळीबार केला होता. मात्र त्या हल्ल्यातून सोनू थोडक्यात बचावला होता.

जीवे मारण्याची दिली धमकी

त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची गँगस्टर रिंदाच्या पंटरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती . या खूनप्रकरणी रिंदा गँगचा सदस्य म्हणून गोलू मंगनाळे तुरुंगात होता. असं असले तरीही गोलू मंगनाळेचे वडील आणि गोलूचे काही साथीदार हे सोनू कल्याणकर याला जीवे मारण्याची धमकी देत होते. अवघ्या 10-12 दिवसांपूर्वीच सोनूला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि काल (सोमवारी) सकाळीच चौघांनी सोनूचा खून केला असा आरोप सोनूच्या वडिलांचा तक्रारीत लावला आहे. प्रेम संबंधातूनच सोनूची हत्या झाल्याचं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे.

सोनू याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तुरुंगातून गोलू मंगनाळे याने तुरूंगातून कट रचून गोलुचे वडील चंद्रवीजय मंगनाळे , तसचे इतर चौघाच्या मदतीने खून केला, असा आरोप असून याप्रकणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....